Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतातही कुराणाची अंमलबजावणी करा! सना मलिक यांच्या विधानाने विधानसभेत गदारोळ; सत्ताधाऱ्यांचा तीव्र संताप

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 23 June 2026, 15:55

मुंबई: राज्याच्या विधानसभेत सध्या एका वेगळ्याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. इस्लाम धर्मातील बहुपत्नीत्वाच्या प्रथेवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदारांमध्ये जोरदार वाद झाला आहे. या चर्चेची सुरुवात भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी केली. त्यांनी बहुपत्नीत्वाच्या प्रथेमुळे मुस्लीम महिलांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. तसेच, राज्यात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याबाबत सरकार कोणती भूमिका घेणार आणि त्यासाठी टास्क फोर्स नेमणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या आरोपांना राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांनी अत्यंत आक्रमक भाषेत उत्तर दिले. केवळ मुस्लीम महिलांवरच अन्याय होतो, हे विधान चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. मलिक यांच्या मते, बहुपत्नीत्वाच्या प्रथा केवळ मुस्लीम धर्मातच नाहीत, तर इतर अनेक समाजातही अशा प्रथांचे अस्तित्व आहे. धर्माच्या नावाखाली चुकीच्या प्रथांना समर्थन देण्यापेक्षा त्या समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘तिहेरी तलाक’बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, इस्लाममध्ये ज्या गोष्टी मान्य नव्हत्या, त्या रद्द झाल्यावर आम्ही स्वतः त्याचे स्वागत केले असते, कारण धर्माचा चुकीचा वापर होणे आम्हालाही मान्य नाही.

सना मलिक यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. पाकिस्तानने नवीन केलं नाही, कुराणमध्ये जे सांगितलं आहे, त्याची अंमलबजावणी केली . भारतामध्येही कुराणची अंमलबजावणी करावी, हिच आमची मागणी आहे.  भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी त्यांच्या विधानाला तीव्र विरोध केला. भाजपचे अतुल भातखळकर यांनी यावर जोरदार टीका करत, “हा देश संविधानानुसार चालतो, कुराणावरून नाही,” असे विधान केले. यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण होते.

 

या संपूर्ण प्रकारामुळे सत्ताधारी महायुतीतील मतभेद उघड झाले आहेत. सना मलिक यांच्या समर्थनार्थ अजित पवार गटाचे इतर नेते उभे राहिल्याने युतीमध्ये दोन स्पष्ट गट पडल्याचे दिसून आले. धार्मिक प्रथा, संविधान आणि राजकीय मतभेद यांमुळे सुरू झालेला हा वाद आगामी काळात अधिक चिघळण्याची शक्यता आहे. या चर्चेने विधानसभेत एकच खळबळ उडवून दिली असून, राजकीय वर्तुळात यावरून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महा ई-सेवा केंद्र चालकांचा शासनाविरुद्ध एल्गार; 1 जुलैपासून आझाद मैदानावर ‘अर्धनग्न’ आंदोलनाचा इशारा, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदारांना दिले निवेदन..

Wednesday, 24 June 2026, 19:53

सियाच्या बॉयफ्रेंडचा ‘मर्डर मास्टरप्लॅन’! कामगाराचा फोन घेतला, सियाला ३ सेकेंडचा कॉल अन् नंतर नेट बंद; फक्त ‘ती’ एक चूक नडली अन्…

Wednesday, 24 June 2026, 19:31

ड्रायव्हरच निघाला ‘एजंट’! केडगाव येथील रॅकेटमध्ये धक्कादायक खुलासे; पैशांची विल्हेवाट लावण्याचे कारस्थान उघड

Wednesday, 24 June 2026, 19:27

बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव; नागरिकांना हरकती व सूचना देण्याचे आवाहन

Wednesday, 24 June 2026, 18:42

ड्युटी बदलल्याच्या रागातून अकाउंटंटवर चाकूने हल्ला; हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाची थरारक कृती

Wednesday, 24 June 2026, 18:39

Hadapsar News : रॅपिडो कॅबच्या भाड्यावरून वाद; चालकाला बेदम मारहाण

Wednesday, 24 June 2026, 18:32
Next Post

ड्रग्स माफियांचे धाबे दणाणले! टीप द्या अन् बक्षीस मिळवा; ड्रग्स विरोधात नागरिकही लढणार, फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.