Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ड्रायव्हरच निघाला ‘एजंट’! केडगाव येथील रॅकेटमध्ये धक्कादायक खुलासे; पैशांची विल्हेवाट लावण्याचे कारस्थान उघड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 24 June 2026, 19:27

राहुलकुमार अवचट

यवत: यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या केडगाव येथील बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) अत्यंत धडक कारवाई करत दि. २३ जुन रोजी अमित टेंगले व सचिन कदम या दोन प्रमुख आरोपींना बेड्या ठोकल्या असून आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दि . २७ जुन पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अटक करण्यात तपासादरम्यान अत्यंत महत्त्वाची व धक्कादायक माहिती मिळाली असून अमित टेंगले हा मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याच्याकडे मागील एक ते दीड वर्षापासून गाडीवर ड्रायव्हर (चालक) म्हणून काम करत होता. ड्रायव्हर म्हणून काम करत असतानाच तो मुख्य आरोपीसोबत गरोदर महिलांचे बेकायदेशीर गर्भलिंग निदान करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असे. तसेच तो स्वतः गरोदर महिलांची गर्भलिंग चाचणी व तपासणी करण्यासाठी ‘एजंट’ म्हणून देखील सक्रिय काम करत होता आणि त्या बदल्यात मोठे कमिशन घेत होता.

 

गर्भलिंग चाचणी व बेकायदेशीर गर्भपाताचे पैसे कायदेशीर यंत्रणांना सुगावा लागू नये म्हणून अमित टेंगले याच्या वैयक्तिक बँक खात्यावर ट्रान्सफर केले जात होते. तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, बेकायदेशीर गर्भपातानंतर अर्भक (गर्भ) वेगवेगळ्या गुप्त ठिकाणी विल्हेवाट लावून गुन्ह्याचा मुख्य पुरावा नष्ट करण्यात याचा थेट सहभाग होता तर सचिन कदम हा देखील मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याला गर्भलिंग निदान व तपासणी करण्याकरिता गरोदर महिला (पेशंट) आणून देऊन ‘एजंट’ म्हणून काम करत होता. या बेकायदेशीर कृत्यातून आणि स्त्री-भ्रूणहत्या रॅकेटमधून मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी याने रोख स्वरूपात स्वीकारलेल्या पैशांची वेगवेगळ्या पतसंस्था, बँका आणि इतर ठिकाणी गुंतवणूक करून तो काळा पैसा कायदेशीर स्वरूपात व्यवहारात आणण्याचे (व्हाईट करण्याचे) मुख्य काम पडद्यामागून करत होता.

अमित बाजीराव टेंगले (वय २७ वर्षे, रा. बोरी पारधी, ता. दौंड, जि. पुणे) सचिन विश्वनाथ कदम (वय ४३ वर्षे, रा. बोरी पारधी, ता. दौंड, जि. पुणे) या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींनी एजंट म्हणून काम करून अजून किती महिलांची गर्भलिंग चाचणी घडवून आणली, गुन्ह्यातील कमावलेला पैसा कोणकोणत्या बँका व पतसंस्थेत गुंतवला आहे, आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणकोणते डॉक्टर किंवा मध्यस्थ सामील आहेत, या सर्व बाबींचा सखोल तपास करण्यासाठी माननीय न्यायालयाने आरोपींना दि. २७ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक राजेंद्र मायने, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांसह यवत पोलीस ठाणे व विशेष तपास पथकाने (SIT) केली आहे

पोलिसांचा कडक इशाराः
सदर बेकायदेशीर कृत्यात किंवा आरोपींना कोणत्याही प्रकारे पेशंट आणून देण्यास, आर्थिक मदत करण्यास अथवा गुन्ह्यातील पैसा लपवण्यास मदत करणाऱ्या इतर कोणत्याही व्यक्तींची गय केली जाणार नाही; त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– संतोष तासगावकर (पोलीस निरीक्षक, यवत पोलीस ठाणे,) तथा मुख्य तपासी अधिकारी, विशेष तपास पथक (SIT) पुणे ग्रामीण.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात पूर्ववैमनस्यातून थरारक राडा; नातेवाईकाच्या अंत्यविधीला निघालेल्या दोन भावांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Thursday, 30 July 2026, 16:33

शरद पवारांनी चर्चा संपवली तरी पडद्यामागे वेगळेच राजकारण सुरू! राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बड्या नेत्याचा मोठा दावा

Thursday, 30 July 2026, 15:59

पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी मेट्रोची पहिली ट्रायल रन यशस्वी; पहिल्या टप्प्यात नेमकी कोणती १२ स्टेशन प्रवाशांसाठी खुली असणार?

Thursday, 30 July 2026, 15:30

पुणे ZP मधील प्रकरण भोवलं! बारामतीतील राष्ट्रावादीच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Thursday, 30 July 2026, 15:27

घराबाहेर जातांना ‘ती’ एक चूक केली अन् घडलं भयंकर; घरी परतल्यावर पायाखालची जमीन सरकली….

Thursday, 30 July 2026, 15:07

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांना अखेर मोठा दिलासा! तब्बल २३ दिवसांनंतर घाटातील मुख्य जीवनवाहिनी पूर्णपणे पूर्ववत

Thursday, 30 July 2026, 15:00
Next Post

सियाच्या बॉयफ्रेंडचा 'मर्डर मास्टरप्लॅन'! कामगाराचा फोन घेतला, सियाला ३ सेकेंडचा कॉल अन् नंतर नेट बंद; फक्त 'ती' एक चूक नडली अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.