Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ड्युटी बदलल्याच्या रागातून अकाउंटंटवर चाकूने हल्ला; हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाची थरारक कृती

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 24 June 2026, 18:39

हडपसर, ता. २४ : ड्युटीचे ठिकाण बदलल्याचा राग मनात धरून सुरक्षा रक्षकाने कंपनीच्या अकाउंटंटवर चाकूसदृश धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील कांचन जोशी आर्केड येथील एका सुरक्षा सेवा कंपनीच्या कार्यालयात २३ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या हल्ल्यात अकाउंटंट गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उषाकिरण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ड्युटी बदलण्याच्या किरकोळ कारणावरून थेट जीवघेणा हल्ला झाल्याने सुरक्षा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अय्युब सुलतान पठाण (वय ३४, रा. हडपसर) असे जखमी झालेल्या अकाउंटंटचे नाव आहे. तर सुरक्षा रक्षक आशिष चौबे (वय अंदाजे २९) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्युब पठाण हे युनिक सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीत गेल्या चार वर्षांपासून अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. कंपनीतील सुरक्षा रक्षकांचे वेतन आणि आर्थिक व्यवहारांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

अय्युब पठाण कार्यालयात काम करत असताना कंपनीतील सुरक्षा रक्षक आशिष चौबे हा तेथे आला. फिल्ड ऑफिसर कुशेंद्र नागरगोजे यांनी त्याची ड्युटी मगरपट्टा येथून बदलून मेघामिल येथे दिल्याच्या कारणावरून तो संतप्त होता. याच रागातून त्याने कार्यालयात मोठमोठ्याने शिवीगाळ सुरू केली.अय्युब पठाण यांनी त्याला शांत राहण्यास सांगितले असता, आशिष चौबे याने तातडीने पगार देण्याची मागणी केली. मात्र नियमानुसार पगार तत्काळ देता येणार नसल्याचे सांगितल्याने तो आणखी संतापला. त्याने शर्टच्या आत लपवून ठेवलेले चाकूसदृश धारदार शस्त्र काढून अय्युब पठाण यांच्या पोटात वार केला. त्यानंतर डोक्यावरही वार करून त्यांना गंभीर जखमी केले.

 

दरम्यान, हल्ल्यानंतर आरोपी आशिष चौबे घटनास्थळावरून पसार झाला. कार्यालयातील कर्मचारी करण कांबळे याने तत्काळ अय्युब यांच्या मित्रांना बोलावले. मित्र विशाल आणि रवी यांनी जखमी अवस्थेतील अय्युब पठाण यांना रिक्षामधून उषाकिरण रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आशिष चौबे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार पुढील तपास करीत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा; सरकारने एलपीजी पुरवठ्यावरील निर्बंध हटवले

Thursday, 25 June 2026, 22:58

उसाच्या शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न; प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली

Thursday, 25 June 2026, 22:34

चिमुकल्याच्या चेहऱ्यावर, नाकावर, ओठांवर मारहाणीच्या खुणा; अंगावर ठिकठिकाणी चावल्याच्या जखमा; प्री स्कुलमध्ये चिमुकल्यासोबत काय घडलं?

Thursday, 25 June 2026, 22:10

हातात झाडू, मनात शिस्त, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा आदर्श उपक्रम

Thursday, 25 June 2026, 21:34

पोलीस ठाण्यातच पोलीस शिपायाला किस करणं पडलं महागात! तात्काळ निलंबनाचे आदेश; व्हायरल व्हिडीओने खळबळ..

Thursday, 25 June 2026, 21:27

मोठी बातमी! सिया गोयलच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका; तातडीने रुग्णालयात दाखल

Thursday, 25 June 2026, 20:38
Next Post

बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव; नागरिकांना हरकती व सूचना देण्याचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.