पुणे: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना CBI ने आतापर्यंत अनेक मोठे खुलासे केले आहेत. या चौकशीच्या धाग्यादोऱ्यांवरून सीबीआयने लातूरच्या प्रसिद्ध आरसीसी (RCC) क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना पुण्यात चौकशीसाठी बोलावले आणि थेट अटक करून दिल्लीला पाठवले.
मोटेगावकर याच्या अटकेनंतर या घोटाळ्याशी संबंधित अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्याने नीट परीक्षेचे पेपर आधीच मिळवून ते आपल्या विद्यार्थ्यांना विकल्याचा गंभीर आरोप आहे.
दरम्यान, चौकशीत अनेक व्हिडीओ समोर येत असून, “कशी गेली सून पबमध्ये फ्लाय करायला”, आणि “ओ सानिया सेक्सी तेरी पोझ” अशी वाक्ये वापरून धातू आणि रसायनांचा क्रम शिकवताना दिसत आहेत. याशिवाय, सोनिया दारूमुळे तिचे लिव्हर खराब झाले, असेही ते बोलत आहेत.
या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता शिवराज मोटेगावकर यांचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते विद्यार्थ्यांना शिकवत असताना अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करताना दिसत आहेत. लक्षात ठेवण्यासाठी अनेकदा शॉर्टकट किंवा गमतीशीर वाक्य वापरले जातात. मात्र, मोटेगावकर सरांनी मर्यादा ओलांडत आक्षेपार्ह विधाने केली आहे.







