Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तुकाराम मुंढेंच्या FDA ला हायकोर्टाचा दणका; धडक मोहिमेला कोर्टाचा ब्रेक?

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 27 July 2026, 13:19

पुणे: राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) मोठ्या प्रमाणावर तपासणी आणि कारवाई करत आहे. मात्र, या कारवाईदरम्यान नियमांचे पालन झाले का, यावर आता उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. न्यायालयाच्या निरीक्षणामुळे काही डेअरींना तात्पुरता दिलासा मिळाला असून, एफडीएच्या कार्यपद्धतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, कोणत्याही डेअरीचा परवाना रद्द किंवा निलंबित करण्यापूर्वी संबंधित व्यावसायिकांना आपली बाजू मांडण्याची संधी देणे आवश्यक आहे. तसेच, नियमांनुसार आढळलेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी किमान 14 दिवसांचा कालावधी देणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया न पाळताच काही ठिकाणी थेट कारवाई करण्यात आल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केला होता.

या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने संबंधित कारवाईला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 8 दूध डेअरींना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवकृपा, कृष्णानंद, जतिन, जयहरी, सिद्धेश्वर, नवनाथ, सरस्वती आणि अन्य एका डेअरीवरील कारवाई सध्या थांबवण्यात आली आहे.

 

या निर्णयामुळे दूध व्यवसायाशी संबंधित हजारो शेतकरी आणि दूध उत्पादकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. डेअरी बंद राहिल्यास दूध संकलन आणि विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर अनेक दुग्ध उत्पादकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, यापूर्वीही एफडीएच्या कारवाईवर न्यायालयाने आक्षेप घेतले होते. नवी मुंबईतील एका हॉटेलचा परवाना रद्द करताना नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन झाले नसल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. तसेच, वर्धा येथील प्रसिद्ध गोरसभंडारवर करण्यात आलेली कारवाईही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली होती. 31 मे रोजी स्वच्छतेच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, योग्य कायदेशीर प्रक्रिया न पाळल्याचे न्यायालयाने नमूद केले.

या संपूर्ण प्रकरणामुळे भेसळविरोधी मोहीम सुरू ठेवणे जितके आवश्यक आहे, तितकेच प्रत्येक कारवाई करताना कायद्याचे नियम आणि न्यायाची तत्त्वे पाळणेही महत्त्वाचे असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 19:28

‘आता तूच माझी बायको, जन्मभर साथ देईन’ म्हणत महिला वकिलाला लॉजवर नेत संबंध ठेवले अन् गर्भवती झाल्यावर… बारामतीत पोलीस हवालदाराचा कारनामा!

Tuesday, 28 July 2026, 19:02

झेडपी-पंचायत समिती सदस्यांसाठी मोठा नियम!जातवैधता प्रमाणपत्र सादर करणं आता बंधनकारक, अन्यथा सदस्यत्व धोक्यात?

Tuesday, 28 July 2026, 18:20

मोदी-शहांसोबतच्या भेटीनंतर राजकारणात मोठा भूकंप; राष्ट्रवादीच्या सत्तेतील सहभागावर अखेर काय म्हणाले शरद पवार?

Tuesday, 28 July 2026, 18:07

CJP आंदोलकांना मोठा दिलासा! मुख्यमंत्री फडणवीसांचा तातडीचा निर्णय, गुन्हे मागे घेण्याचे आदेश

Tuesday, 28 July 2026, 18:02

खुटबावमध्ये मध्यरात्री दरोड्याचा कट उधळला! स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची संयुक्त कारवाई; पाच जण जेरबंद

Tuesday, 28 July 2026, 17:40
Next Post

चासकमान कालव्याच्या कामावर शेतकऱ्यांचा आक्षेप; अस्तरीकरणाचे काम पाडले बंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.