लखनौ : उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील भाजपच्या नेत्याचा एका तरुणीसोबतच्या अश्लील कृत्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात भाजप नेता नको त्या अवस्थेत दिसत आहे, संबंधित भाजपा नेत्याला पोलिसांनी तुरुंगात टाकले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या नेत्याने स्वतः तरुणीसोबतचा व्हिडिओ सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भाजप नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे.
आयपीएस अंकिता शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलदीप भदौरिया असे नेत्याचे नाव आहे. कुलदीपने एका तरुणीसोबतचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात समाजात अश्लीलता पसरवल्याप्रकरणी गुजैनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.