Tuesday, November 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अंकिता भंडारीला 4 वर्षांनंतरही न्याय मिळाला नाही? न्याय मागण्यासाठी इंडिया गेटवर आंदोलन, पण पहाटेच पोलिसांची कारवाई

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 15 October 2026, 10:17

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणात न्याय मिळावा, या मागणीसाठी दिल्लीतील इंडिया गेट परिसरात सुरू असलेले आंदोलन गुरुवारी पहाटे पोलिसांनी हटवले. या कारवाईदरम्यान अंकिताचे आई-वडील, काँग्रेसचे काही नेते आणि अन्य आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. नंतर सर्वांची सुटका करण्यात आली. मात्र, आंदोलन करणाऱ्यांशी पोलिसांनी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

बुधवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी आंदोलनस्थळी जाऊन अंकिताच्या पालकांची भेट घेतली होती. त्यानंतर काही तासांतच पोलिसांनी कारवाई केल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. पहाटे सुमारे 4 वाजता ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. काँग्रेस नेते सुप्रिया श्रीनेत, उदय भानू चिब, विनोद जाखड आणि वरुण चौधरी यांनाही ताब्यात घेण्यात आले होते.

अंकिताच्या हत्येमागे एका कथित ‘व्हीआयपी’ व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या पैलूची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत दुष्यंत कुमार गौतम यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी झालेली नियुक्तीला निषेध करत आहेत.

अंकिता भंडारी ही ऋषिकेशजवळील वनंत्रा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. 19 वर्षीय अंकिताची 18 सप्टेंबर 2022 रोजी हत्या झाली होती. चार दिवसांनंतर तिचा मृतदेह चिल्ला कालव्यात सापडला. या प्रकरणात रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य आणि कर्मचारी सौरभ भास्कर व अंकित गुप्ता यांना अटक करण्यात आली होती. 30 मे 2025 रोजी न्यायालयाने तिघांना हत्या, पुरावे नष्ट करणे आणि अन्य गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

काँग्रेस नेते पवन खेरा, सुप्रिया श्रीनेत आणि काझी निजामुद्दीन यांनी पोलिसांच्या कारवाईवर टीका केली. न्यायाची मागणी करणाऱ्या कुटुंबीयांना ताब्यात घेण्याऐवजी त्यांच्या मागण्यांची दखल घ्यायला हवी होती, असे त्यांनी म्हटले. सीबीआयचा तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित नियुक्ती स्थगित ठेवावी, अशी मागणी अंकिताचे वडील वीरेंद्र सिंह भंडारी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे.

या प्रकरणातील कथित ‘व्हीआयपी’ संबंधांची चौकशी व्हावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात कौटुंबिक वादाचा थरारक शेवट! पत्नी आणि मेहुणीच्या बोलण्याला कंटाळून 30 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल..

Tuesday, 10 November 2026, 13:44

पुणेकरांनो सावधान! ‘डिजिटल ॲरेस्ट’च्या नावाखाली लाखोंची लूट, सायबर चोरट्यांचा नवा डाव!

Tuesday, 10 November 2026, 13:30

सोरतापवाडीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दलित कुटुंबावर 20 ते 25 जणांच्या टोळक्याचा हल्ला; तीन दिवस उलटूनही उरुळी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

Tuesday, 10 November 2026, 13:13

मुंबई-पुणे प्रवासाचा वेग वाढणार! तासाभराची बचत होणार; गेमचेंजर प्रकल्पाला मोठी गती, प्रवाशांना दिलासा!

Tuesday, 10 November 2026, 13:04

शिरूर नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष पेटला! शरद पवार गट आक्रमक; प्रकाश धारीवाल यांना अप्रत्यक्ष शह देण्याची खेळी?

Tuesday, 10 November 2026, 12:49

भीमा पाटसचा शेतकऱ्यांना दिलासा; ऊस गाळपाच्या पहिल्या टप्प्यातच प्रतिटन ३,५०० रुपये

Monday, 9 November 2026, 19:50
Next Post

MPSC च्या तयारीत जुळलं प्रेम, थाटामाटात लग्नही झालं! पण संसार सुरू होताच पतीचा भयानक चेहरा उघड; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp