पुणे: सोन्या-चांदीच्या (Gold Price Today) किमतींमध्ये किंचित घसरण पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता आणि इतर आर्थिक घटकांमुळे देशांतर्गत बाजारातही दर खाली आले आहेत. आज, 17 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात घट झाली आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,25,070 इतका नोंदवण्यात आला, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,14,640 आहे. चांदीचा दर देखील प्रति किलोग्रॅम 1,68,900 पर्यंत खाली आला आहे.

16 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात किंचित स्थिरता होती, परंतु तरीही दर उच्च स्तरावर होते. या दिवशी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 1,25,080 इतका होता, तर 18 कॅरेट सोन्यासाठी तो दर 93,810 नोंदवला गेला.
लग्नसराईचा आणि सणासुदीचा काळ जवळ असताना, दरांमध्ये झालेली ही घट समाधानकारक नसून सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी दरात मोठी घट कधी होणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. अनेक ग्राहक या ‘गोल्डन’ संधीची वाट पहात आहेत.
तुम्ही गुंतवणूक म्हणून किंवा दागिन्यांसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे दरांमध्ये कधीही बदल होऊ शकतो, त्यामुळे पुढे दर वाढू ही शकतात किंवा कमीही होऊ शकतात. त्यामुळे संधीची वाट न पाहता सोने खरेदी करणे उत्तम राहील. दरम्यान, खरेदी करण्यापूर्वी बाजारातील दरांचा योग्य अभ्यास करणे आवश्यक आहे.






