Pune Station Security: पुणे रेल्वे स्थानकावरील सुरक्षा (Pune Station Security Upgrade) व्यवस्थे संदर्भात मोठी घोषणा केली आहे. प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सेंट्रल रेल्वेने स्टेशन परिसरात 160 अत्याधुनिक एआय बेस सीसीटीव्ही कॅमेरे (160 AI CCTV) बसवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. पुणे शहर देखील सर्वांत गर्दीचे प्रमाण असलेले ठिकाण आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षा बळकट करण्यासाठी हे उपाययोजना केल्या जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच झालेल्या दिल्लीतील बॉम्ब ब्लास्ट दुर्घटनेनंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहरातील स्टेशन परिसरात नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. सुरक्षेचा प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बसवण्यात येत असलेले AI CCTV कॅमेरे रेल्वे पोलिसांसाठी मोठा आधार ठरणार आहेत. पुणे स्टेशनवर असलेले जूने सीसीटीव्ही कॅमेरे टप्याटप्याने हटवण्यात येत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
160 AI CCTVमुळे गुन्हेगार ओळखणे सोपे
या नवीन एआय प्रणालीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे फेस रेकग्निशन क्षमता. हे पोलिसांसाठी विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. पोलिसांच्या डेटाबेसमधील कोणताही आरोपी अथवा संशयित व्यक्ती स्टेशन परिसरात दिसताच प्रणाली त्वरित कंट्रोल रुमला अर्लट पाठवले जाणार आहे. अलर्टमध्ये त्या व्यक्तीचा फोटो, त्याची ओळख संबंधित माहिती, तो सध्या नेमका कुठे उभा आहे? ही माहिती मिळेल. हा एआय बेस कॅमेरा उत्तम काम करेल अशा दावा रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

जाणून घेऊ नवीन प्रणालीचे वैशिष्ट्य
या नवीन प्रणालीमध्ये नाईट व्हिजन क्षमता सर्वांधिक जास्त आहे. रात्री किंवा कमी प्रकाशातही दृश्य स्पष्ट दिसू शकते. या कॅमेराची फोर-के (4K) क्वालिटी असणार आहे. कॅमेरातून उच्च स्पष्टतेचे रेकॉर्डिंग होणार, एआय-आधारित विश्लेषण: संशयास्पद हालचाली, गर्दीतील अनियमितता ओळखण्याची क्षमता या कॅमेरात असणार आहे ज्यामुळे अर्लट मिळू शकतो. तसेच यात फेस रेकग्निशन सिस्टम असल्यामुळे गुन्हेगार ओळखून त्वरित अलर्ट देऊ शकतो.
कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण होईल, काम अंतिम टप्प्यावर आले आहे अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), मध्य रेल्वे, पुणे विभाग यांनी दिली.






