नवी दिल्ली : कल तुर्की आणि सीरियामध्ये मोठा भूकंप झाला. मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली असताना या दोन्ही देशांकडे भारतासह जगभराने मदतीचा हात पुढे केला. भारताने देखील तातडीने मदतीची विमाने तुर्कीकडे पाठवली असता, पाकिस्तान पुन्हा एकदा भारताच्या विमानांना पाकिस्तानची हवाई हद्दीत प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे मदत घेऊन जाणाऱ्या विमानांना वळसा घालून तुर्कीत मदत पोचवावी लागली.
भूकंपामुळे तुर्कीतील जनजीवन विस्कळीत झाले असल्याने जगभरातून मदतीचा ओघ सूरु झाला आहे. भूकंपाच्या धक्क्याने घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या असून सुमारे ४००० पेक्षा अधिक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. अनेक ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक नागरिक अडकले आहेत. त्यातच हवामान बदलणे बचाव कार्यात अनेक अडथळे निर्माण होत आहेत.
यासाठीच भारताने विशेष प्रशिक्षित श्वानपथकासह एनडीआरएफच्या जवानांची दोन पथके, आवश्यक उपकरणे व जीवनावश्यक वस्तूंचा साठा तुर्कीकडे पाठवला होता. यामुळे बचाव कार्यात मोठी मदत होणार होती. तुर्कीला जाण्यासाठी भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून गेले असता तुर्कीला तातडीने मदत उपलब्ध झाली असती.
मात्र पाकिस्तानने भारतीय विमानांना आपल्या हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे तातडीने तुर्कीसाठी मदत घेऊन निघालेल्या विमानांना वळसा घालून तुर्कीत प्रवेश करावा लागला.
तुर्कीचे भारतातील राजदूत यांनी तुर्कीला मदत केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. फिरात सुनेलने भारताचे आभार मानले.