Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर – नायगाव- उरुळी कांचन रस्त्याच्या कामाला दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारास प्रतिदिन ५ हजार रुपये दंड? उरुळी कांचन भाजप पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे ठेकेदाराला बसला दणका…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 7 February 2023, 15:47

उरुळी कांचन, (पुणे) : थेऊर- नायगाव- उरुळी कांचन रस्त्याच्या कामाला दिरंगाई करणाऱ्या मोतीलाल धुत इन्फास्ट्रक्चर कंपनीला प्रतिदिन ५ हजार रुपये विलंब भरपाई आकारणीचा प्रस्ताव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी पुणे येथील सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे सादर केला आहे. नुकसान भरपाईच्या प्रस्तावासंदर्भात निर्णय आल्यानंतर लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी दिली आहे.

उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक तीन मधील महादेव कांचन कॉलेज ते बायफ संस्थेच्या गेट पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण कामासंदर्भात गेल्या चार महिन्यांपासून उरुळी कांचन येथील भाजपचे पदाधिकारी पाठपुरावा करीत आहेत. यासंदर्भात भाजप पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अजय भोसले यांना या कामासंदर्भात सोमवारी (ता. ६) माहिती विचारली असता यावेळी भोसले यांनी ही माहिती दिली.

यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा पुजा सणस, हवेली तालुका झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष आबासाहेब चव्हाण, उरुळी कांचन शहर भाजप शहराध्यक्ष अमित कांचन, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष गणेश घाडगे, मानसी भुजबळ व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

दरम्यान, थेऊर-नायगाव-उरुळीकांचन या रस्त्याची २०१८ साली पुर्ण टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. हे काम मोतीलाल धुत इन्फास्ट्रक्चर प्रा. लि या कंपनीला मिळाले होते. कंपनीने या रस्त्याचे काम सन २०१९ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु, सदर ठेकेदाराने काम संथगतीने सुरू केले, त्यामुळे त्याला पैसे उशिरा मिळाले. आता उशिरा कामामुळे जानेवारी २०२३ पासून काम पूर्ण होईपर्यंत दररोज ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे, तसेच सर्व रस्त्याचे काम मार्च २०२३ अखेर पर्यंत पूर्ण करण्याची मुदत दिली आहे.

दरम्यान, अद्यापपर्यंत सदरचे काम पूर्ण करण्याबाबतचे कुठल्याही प्रकारचे नियोजन करण्यात आल्याचे ठेकेदाराकडून दिसून आलेले नाही किंवा त्याने यासंदर्भात विभागास कळविलेले नाही. ठेकेदारास यापूर्वीही काम पूर्ण करण्यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, ठेकदार यांनी प्रत्यक्ष काम सुरु केलेले नसल्याने प्रतिदिन ५ हजार रुपये विलंब भरपाई आकारणी प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे सादर सादर केला आहे. प्रस्तावासंदर्भात निर्णय आल्यानंतर त्वरित पुढील कारवाई करण्यात येईल, असे अजय भोसले यांनी सांगितले.

याबाबत बोलताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले म्हणाले कि, उरुळी कांचन येथील भाजपचे पदाधिकारी या रस्त्याच्या कामासंदर्भात वारंवार पाठपुरावा करीत आहे. नागरिकांनी उर्वरित डांबरीकरणाचे काम त्वरित सुरु करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारास काम सुरु करण्यासाठी नोटीस देण्यात आलेली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

यवत येथील श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी माता यात्रेची कुस्तीच्या आखाड्याने सांगता ; यवतकरांनी अनुभवला महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही मल्लांचा थरार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.