Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयुर्वेदिक औषधही नाहीत सुरक्षित! FDA ने पुण्यासह ‘या’ शहरातील 10 कंपन्यांचे परवाने केले कायमचे रद्द; पहा कंपन्यांची यादी

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 12 August 2026, 8:29

पुणे : महाराष्ट्रातील आयुर्वेदिक औषधांच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. राज्यातील तब्बल 434 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत नियमांचे गंभीर उल्लंघन आढळलेल्या 10 कंपन्यांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

या तपासणी मोहिमेदरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्या आणखी 135 संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता यावर परिणाम होऊ शकतील, अशा त्रुटी काही उत्पादन केंद्रांमध्ये आढळून आल्या. त्यामुळे संबंधित कंपन्यांविरोधात कठोर निर्णय घेण्यात आला.

तपासणीमध्ये काही ठिकाणी आवश्यक तांत्रिक कर्मचारी उपस्थित नसतानाही औषधांचे उत्पादन सुरू असल्याचे समोर आले. तसेच काही कंपन्यांमध्ये स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रण विभाग कार्यरत नसल्याचे आढळले. औषधांच्या निर्मिती आणि तपासणीसाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध नसणे, उत्पादन परिसरात स्वच्छतेचा अभाव आणि मंजूर आराखड्यानुसार सुविधा नसणे, अशा त्रुटीही निदर्शनास आल्या.

काही संस्थांकडे कच्चा माल, तयार औषधे आणि बॅच उत्पादनासंदर्भातील आवश्यक नोंदी उपलब्ध नव्हत्या. औषधांच्या चाचण्यांचे अहवाल, नियंत्रण नमुने आणि मास्टर फॉर्म्युलासारखे महत्त्वाचे रेकॉर्डही काही ठिकाणी आढळले नाहीत. कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी आणि प्रशिक्षणाच्या नोंदींचाही अभाव असल्याचे तपासणीत समोर आले.

 

याशिवाय औषधांच्या लेबलवर चुकीची उत्पादन तारीख, कच्च्या मालाची पुरेशी तपासणी न करणे आणि वेगवेगळ्या औषधांचे घटक एकमेकांत मिसळू नयेत यासाठी आवश्यक कार्यपद्धती नसणे, अशा बाबीही आढळल्या.

दरम्यान, समोर आलेल्या माहिती नुसार, खाली दिलेल्या कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.

  • मे. कृष्णा हर्बल, बारामती, पुणे
  • मे. लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स, करंजा, गोंदिया
  • मे. आदित्य फार्मा, वडेगाव, तिरोडा, गोंदिया
  • मे. अंगरस आयुर्वेद, वडेगाव, तिरोडा, गोंदिया
  • मे. कालिदास गांधी, पुणे
  • मे. शिवनाथ आयुर्वेदिक प्रोडक्ट्स कंपनी, सिन्नर, नाशिक
  • मे. इंडुकेअर फार्मा प्रा. लि., जेजुरी एमआयडीसी, पुरंदर, पुणे
  • मे. हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर, अमरावती
  • मे. हिलॅरियस आयुर्वेद, एमआयडीसी मुंडीपार, गोंदिया
  • मे. यशोदा लॅब प्रा. लि., नाशिक रोड, नाशिक

कायमस्वरूपी परवाने रद्द झालेल्या संस्थांमध्ये पुणे, गोंदिया, नाशिक, अमरावती आणि इतर भागांतील उत्पादकांचा समावेश आहे. FDA च्या या कारवाईमुळे आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनातील नियमांचे पालन आणि गुणवत्ता नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बंडू आंदेकर टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची नाना पेठेत धडक कारवाई

Wednesday, 9 September 2026, 22:57

यवत गर्भलिंग निदान प्रकरणात SITची मोठी कारवाई; मुख्य आरोपीच्या पत्नीला अटक, तिघांचा जामीन फेटाळला

Wednesday, 9 September 2026, 22:05

भरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलत; उमेदवारांना थेट सहभागाची संधी

Wednesday, 9 September 2026, 21:35

आईनेच स्वतःच्या लेकीच्या केला सावकाराशी सौदा! कर्ज फेडण्यासाठी लेकीचे नग्न व्हिडीओ सावकाराला पाठवले अन् ‘तो म्हणेल ते कर’ म्हणत….

Wednesday, 9 September 2026, 20:54

पोलिस अधिकारी कृष्णा बाबरला 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडी; लोणी काळभोर हद्दीतील लाच प्रकरणाच्या तपासाला वेग

Wednesday, 9 September 2026, 20:13

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट! पार्थ पवार यांना आरोपी का केलं नाही? हायकोर्टाचा मोठा सवाल

Wednesday, 9 September 2026, 19:52
Next Post

पुणे जिल्ह्यात अनुपस्थित, स्थलांतरित, मयत आणि दुबार मतदारांची यादी केली प्रसिद्ध; मतदारांना नाव तपासण्याचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp