Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलिस अधिकारी कृष्णा बाबरला 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी ४ दिवसांची पोलीस कोठडी; लोणी काळभोर हद्दीतील लाच प्रकरणाच्या तपासाला वेग

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 9 September 2026, 20:13

लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा जनार्दन बाबर यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बाबर यांना १२ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे घटकाकडे ५७ वर्षीय व्यक्तीने ८ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(३), ३१८(५) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास एपीआय कृष्णा बाबर यांच्याकडे होता. गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर न्यायालयात दाखल करण्यासाठी ५० हजार रुपये, तसेच तक्रारदाराचा मुलगा प्रतिक याच्या उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्जात मदत करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने ८ सप्टेंबर रोजी सापळा रचला. मांजरी येथील १५ चौक परिसरात शितलादेवी मंदिरासमोर, श्रीकांत ट्रेडिंग दुकानाजवळ हा सापळा लावण्यात आला. बाबर यांनी त्यांच्या सियाज कारमध्ये पंचासमक्ष तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. त्यानंतर रात्री ११.०२ वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी न्यायालयाने बाबर यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

 

ही कारवाई सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सतिश वाळके हे पर्यवेक्षण अधिकारी होते. पोलीस अंमलदार भूषण ठाकूर, महिला पोलीस शिपाई वैशाली माकर आणि चालक पोलीस हवालदार दीपक काकडे यांचा सापळा पथकात समावेश होता. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आता चार दिवसांच्या पोलीस कोठडीत तपास यंत्रणा लाच मागणी आणि स्वीकारण्यामागील संपूर्ण व्यवहाराची चौकशी करणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

यंदा दसरा २० की २१ ऑक्टोबरला? देवी विसर्जन कधी? जाणून घ्या अचूक तारीख अन् मुहूर्त

Sunday, 11 October 2026, 22:55

मोठी बातमी! तुकाराम मुंढेंवर नवी जबाबदारी; आता MPSC आयोगावर सचिव म्हणून पाहणार कामकाज, मंत्री शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Sunday, 11 October 2026, 22:51

समुद्रात मृत्यूचा थरार! ३०५ लोकांनी भरलेली बोट उलटली, १०९ जणांचा मृत्यू; बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Sunday, 11 October 2026, 21:34

कोणत्या शेतकऱ्यांचा खात्यात थेट जमा होणार ४ हजार रुपये? डबल लाभ कोणाला मिळणार? मोठी अपडेट समोर….

Sunday, 11 October 2026, 20:05

शेतजमीन खरेदी करताय? तर ही ‘५’ कागदपत्र तुमच्याकडे असायलाच हवी; फसवणूक आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी वाचा सविस्तर…

Sunday, 11 October 2026, 19:48

६ महिन्यांत नोकरी हवीय? झटपट अभ्यास अन् पटकन नोकरी मिळवण्यासाठी ‘या’ कोर्सेसला प्रवेश घ्या आणि कमी वेळात पैसे कमवा

Sunday, 11 October 2026, 19:31
Next Post

आईनेच स्वतःच्या लेकीच्या केला सावकाराशी सौदा! कर्ज फेडण्यासाठी लेकीचे नग्न व्हिडीओ सावकाराला पाठवले अन् 'तो म्हणेल ते कर' म्हणत....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp