Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

समुद्रात मृत्यूचा थरार! ३०५ लोकांनी भरलेली बोट उलटली, १०९ जणांचा मृत्यू; बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 11 October 2026, 21:34

जिबूती: रोजगाराच्या शोधात आणि चांगल्या भविष्याच्या आशेने समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्या स्थलांतरितांवर काळाने घाला घातला आहे. जिबूतीहून येमेनच्या दिशेने निघालेली सुमारे ३०५ प्रवाशांची बोट ८ आणि ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री समुद्रात उलटली. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान १०९ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये १५ मुलांचा समावेश आहे. तर ११६ हून अधिक प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने (आयओएम) रविवारी ही माहिती दिली.

आयओएमच्या माहितीनुसार, जिबूतीमधील ओबॉक या बंदर शहराच्या उत्तरेकडे गुहेरे परिसरात ही दुर्घटना घडली. बोटीतून प्रवास करणाऱ्यांपैकी ८० हून अधिक जणांना वाचवण्यात यश आले आहे. बचावलेल्या सर्व प्रवाशांचे नागरिकत्व इथिओपियाचे असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी जिबूती प्रशासनाकडून समुद्रात शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे.

मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश

या दुर्घटनेनंतर १०९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये ५२ पुरुष, ४२ महिला आणि १५ मुलांचा समावेश आहे. मृत मुलांमध्ये नऊ मुली आणि सहा मुलगे आहेत. या घटनेमुळे रोजगार आणि सुरक्षित आयुष्याच्या शोधात धोकादायक समुद्री मार्गांचा वापर करणाऱ्या स्थलांतरितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जिबूतीतील आयओएमचे मिशन प्रमुख अलेक्झांडर कोइसॅक यांनी सांगितले की, संघटनेचे पथक स्थानिक अधिकाऱ्यांच्या सहकार्याने घटनास्थळी मदतकार्य करत आहे. बचावलेल्या प्रवाशांना वैद्यकीय मदत दिली जात असून, मृतांवरील अंत्यसंस्कारांची व्यवस्थाही करण्यात येत आहे.

दरम्यान, येमेनमध्ये सरकारी सैन्य आणि इराणसमर्थित हुती बंडखोरांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना घडली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने २०२२ मध्ये झालेल्या युद्धविरामानंतर सीमापार हल्ल्यांमध्ये घट झाली होती; मात्र या भागातील अस्थिरतेबाबत चिंता कायम आहे. आयओएमच्या मागील आठवड्यातील आकडेवारीनुसार, संघर्षामुळे विस्थापित झालेल्या लोकांची संख्या सप्टेंबरच्या मध्यातील ७६ हजारांवरून वाढून सुमारे दोन लाखांपर्यंत पोहोचली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26

उरुळी कांचन येथील तळवडी चौकातून सुझुकी अ‍ॅक्सेस चोरीला! चावी गाडीला राहिल्याने चोरट्याने घेतला फायदा

Monday, 16 November 2026, 18:09

केडगावात पैशांच्या वादातून मेव्हण्यांकडून भावजीला लोखंडी रॉडने मारहाण

Monday, 16 November 2026, 18:07

Saswad News : विहिरीच्या पाण्यावरून चुलत भावांमध्ये राडा; दगडफेकीत आर्थिक नुकसान

Monday, 16 November 2026, 18:04

‘मफलर मॅन’ म्हणून रोहित पवारांनी दाखवला फडणवीसांचा फोटो! म्हणाले “या व्यक्तीने घातपात केला असं..” महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

Monday, 16 November 2026, 17:59

रेशनकार्ड विभक्त करताच धान्य बंद; उत्पन्नाचा दाखला अनिवार्य!

Monday, 16 November 2026, 17:42
Next Post

मोठी बातमी! तुकाराम मुंढेंवर नवी जबाबदारी; आता MPSC आयोगावर सचिव म्हणून पाहणार कामकाज, मंत्री शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp