नवी दिल्ली: भारताने अमेरिकेला जबर धक्का दिला आहे. भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’ विरोधात अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने (यूएससीआयआरएफ) प्रतिबंध लावण्याचे कारस्थान रचले होते. हा रिपोर्टच भारताने झिडकारून लावत हा आयोगच चिंतेचा विषय असल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
या अहवालात भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’वर हत्येच्या कटात कथित भूमिकेसाठी निर्बंध घालण्याची शिफारस करण्यात आली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या कारस्थानाविरोधात एक कठोर शब्दांत निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात लोकशाही आणि सहिष्णुतेचे प्रतीक म्हणून असलेली भारताची प्रतिमा खराब करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे म्हटले आहे. प्रत्यक्षात यूएससीआयआरएफलाच ‘चिंतेचा विषय’ मानले पाहिजे, असे या निवेदनात स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.