Elvish Yadav : नवी दिल्ली : एल्विश यादव प्रकरणी वैदकीय अहवालात समोर आली आहे. त्यामुळे आता एल्विश यादवच्या अडचणी वाढणार असल्याची चिन्ह आहेत. ‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादववर नोएडातील रेव्ह पार्टीतील छाप्यादरम्यान आढळलेल्या सापाचं विष, परदेशी मुलींचा ‘सप्लाय’ यामुळे त्याच्यासह आणखी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणाचा वैदकीय अहवाल समोर आला आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वैदकीय अहवालात काय ?
नोएडातील रेव्ह पार्टीतील छाप्यानंतर वनविभागातकडून सापांची वैद्यकीय तपासनी करण्यात आली होती. या तपासात पाच कोबरा, चार साप याचा समावेश होता. आता या तपासात पाच कोबरा विषारी असल्याचे तर चार साप विषारी नसल्याचं उघड झालं आहे. डेप्युटी सीव्हीओच्या पॅनेलतर्फे वैद्यकीय प्रशिक्षण करण्यात आलं आहे. विषारी सापाची विक्री करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. यामुळे गुन्हेगाराला सात वर्षापर्यंतची शिक्षा भोगावी लागते. आता न्यायालयाच्या परवानगीनंतर सापांना जंगलात सोडण्यात आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
मेनका गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या पीएएफ संस्थेला माहिती मिळाली होती की, एल्विश यादव ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवतो. विषारी सापांचे व्हिडीओ शूट करतो. परदेशी मुलींचा ‘सप्लाय’ करतो. त्यामुळे त्यांनी प्रकरणात लक्ष घातले. परिणामी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या एल्विशवर गुन्हा दाखल केला आहे.
एल्विश यादव कोण ?
एल्विश यादवने 2023 मध्ये ‘बिग बॉस ओटीटी’चे विजेते पद पटकावले होते. एल्विश यादव युट्यूबर आहे. एल्विश यादवला कारचं खूप वेड आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या कार आहेत. मात्र, आता ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचं विष पुरवल्याचा एल्विशवर आरोप आहे. रेव पार्टीत विषारी सापांचं विष पुरवणं, परदेशी मुलींचा ‘सप्लाय’ करणं असे अनेक आरोप एल्विशवर लावण्यात आले आहेत. पण या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं एल्विश म्हणाला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांना सहकार्य करण्यास तो तयार आहे.