नवी दिल्ली: एका निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदींवर अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल निवडणूक आयोगाने राहुल गांधींना (Rahul Gandhi) नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून 25 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उत्तर मागितले आहे. पंतप्रधान मोदींबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली होती.
बुधवारी (22 नोव्हेंबर) भाजपने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली होती. पक्षाचे सरचिटणीस राधामोहन दास अग्रवाल यांच्यासह शिष्टमंडळातील इतर नेत्यांनी राहुल गांधींचे वक्तव्य अपमानास्पद असल्याचे म्हटले होते.