नवी दिल्ली : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आजपासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होणार आहे. निवडणूक आयोगात होणाऱ्या या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीला रवाना झाले असून आज सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे आजच्या सुनावणीत अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा केल्यानंतर आज दोन्ही गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनावणीला आमनेसामने येण्याची शक्यता आहे. (NCP Crisis)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचं या मुद्द्यावर निवडणूक आयोगात सलग तिसरी सुनावणी सुरु आहे. या सुनावणीला खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे तीन महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सुनावणी ला जाण्याच्या आधी शरद पवार मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटून आले होते. दुसऱ्या सुनावणीच्या वेळीही ते उपस्थित होते. आज सलग तिसऱ्या सुनावणीत शरद पवार प्रत्यक्ष हजर राहणार आहेत. (Election Commission)