Friday, November 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिवाळी संपली पण पगारवाढीचं काय? आठव्या वेतन आयोगाबाबत सर्वात मोठी अपडेट; आयोगाच्या निर्णयाची कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 13 November 2026, 16:19

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिवाळी संपल्यानंतरही आठव्या वेतन आयोगाकडून पगारवाढीची घोषणा झालेली नाही. मात्र, कर्मचारी संघटनांनी वेतन, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. यामध्ये सध्याचा १८ हजार रुपयांचा किमान मूळ पगार वाढवून ६९ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच पेन्शन ५० टक्क्यांवरून ६७ टक्के आणि वार्षिक वेतनवाढ ३ टक्क्यांवरून ६ टक्के करण्याची मागणी करण्यात आली आहे.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची प्रमुख संघटना नॅशनल कौन्सिल (स्टाफ साइड) जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (NC-JCM) यांनी आठव्या वेतन आयोगाकडे आपल्या शिफारशी सादर केल्या आहेत. यामध्ये सध्याचा किमान मूळ पगार १८ हजार रुपयांवरून थेट ६९ हजार रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या पगारवाढीसाठी ३.८३३ फिटमेंट फॅक्टर प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय पे-लेव्हल २ आणि ३ एकत्र करून नवीन वेतनश्रेणी तयार करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के पेन्शन दिली जाते. ही मर्यादा वाढवून ६७ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच फॅमिली पेन्शन ३० टक्क्यांवरून ५० टक्के करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढही सध्याच्या ३ टक्क्यांऐवजी ६ टक्के करण्याचा प्रस्ताव आहे. या बदलांमुळे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

घरभाडे भत्ता म्हणजेच HRA मध्येही मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या शहरांच्या श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांना ३०, २० आणि १० टक्के HRA दिला जातो. हे दर अनुक्रमे ४०, ३५ आणि ३० टक्के करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या रजा रोखीकरणाची मर्यादा ३०० दिवसांवरून ६०० दिवस करण्याचा प्रस्तावही कर्मचारी संघटनेने मांडला आहे.

आठव्या वेतन आयोगाकडे कर्मचारी संघटनेने मांडलेल्या या शिफारशी आहेत. त्यामुळे ६९ हजार रुपये किमान मूळ वेतन, वाढीव पेन्शन किंवा भत्त्यांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. या मागण्यांवर आयोग आणि केंद्र सरकार काय निर्णय घेतात, याकडे देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग? दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल्ल पटेलांची 35 मिनिटे गुप्त चर्चा!

Friday, 13 November 2026, 20:47

मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना हक्काचं घर! 8 वारसांना मोफत घरे देण्याचा आयुक्तांचा आदेश

Friday, 13 November 2026, 20:12

उरुळी कांचन येथील ‘जिओ मार्ट’मधून मुदतबाह्य खाद्यपदार्थांची सर्रास विक्री ;जागरूक नागरिकाने प्रकार आणला उघडकीस

Friday, 13 November 2026, 19:21

दूध उत्पादकांसाठी मोठी बातमी! गाय-म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; कात्रज डेअरीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय!

Friday, 13 November 2026, 18:43

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर खळबळ! अमृत भारत एक्स्प्रेसमधून तब्बल १ कोटी ४८ लाखांची रोकड जप्त; आरपीएफची धडक कारवाई

Friday, 13 November 2026, 17:49

सरकारी पगार घेऊनही रेशनच्या धान्याचा लाभ ! 1.82 लाख कर्मचाऱ्यांची होणार चौकशी; सरकारचा मोठा निर्णय..

Friday, 13 November 2026, 17:48
Next Post

पुण्यात पोलिसांवरच जीवघेणा हल्ला! दारूच्या नशेत तर्रार असलेल्या दोघांनी पोलीस उपनिरीक्षकाशी केली झटापट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp