Delhi Accident : राजधानी दिल्लीमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव बीएमडब्ल्यू कारने पार्किंगमधील वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत चार पादचारी गंभीर जखमी झाले आहे. तर एका कारचा चक्काचूर झाला आहे. जखमी झालेल्या चौघांना एम्स ट्रामा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास एन्क्लेव येथे घडली.(Delhi Accident)
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलास एन्क्लेव्ह-2 परिसरात काल रात्री उशिरा एका भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारने पार्क केलेल्या वाहनाला मागून जोरदार धडक दिली, या धडकेत चार पादचारी गंभीर जखमी झाले आहे. यशवंत नलावडे (वय, ५८) , देवराज मधुकर (वय, ५०) मनोहर (वय, ६२) आणि नितीन अशी जखमींची नावे आहेत.
जखमींना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे चौघे जण रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री जेवण करून शतपावलं करण्यासाठी बाहेर आले होते. यावेळी हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ही बीएमडब्ल्यू कार एक महिला चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारने आधी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या मारुती सियाज कारला मागून जोराची धडक दिली. या धडकेत मारुती सियाझ कर उलटी झाली, आणि चार पादचाऱ्यांच्या त्याची धडक बसली. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.