crime news : चंदीगड : हरियाणातील रेवाडी येथे नव्या सुनेचा पराक्रम एकून रेवाडी परिसर हादरून गेला आहे. ती आली.. तीनं पाहिल.. तीनं चोरून नेलं सार.. हे म्हणण्याची वेळ सासरच्यांवर आली आहे. बावल विधानसभेच्या टंकडी गावातील लक्ष्मीनारायण उर्फ राजकुमार शर्मा यांचा विवाह उत्तर प्रदेशातील तरुणीशी झाला होता. एका मध्यस्थाच्या माध्यमातून हे लग्न ठरले होते. राजकुमारच्या घरच्यांनी मोठ्या थाटामाटात हे लग्न लावून दिले होते. वधूसोबत तिचा भाऊ आणि वहिनीही आले होते. संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते, आजूबाजूचे लोकही वधूला पाहण्यासाठी, तिला आशिर्वाद देण्यासाठी येत होते. अन् लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नववधूनं सर्व महागड्या वस्तू पळवून नेल्या.
राजकुमार शर्मा यांचा घरात लग्नाचा माहोल, नव्या सुनेचा नुकताच गृहप्रेवश झाला होता. लग्न नीट पार पडल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधान होते. आजूबाजूचे लोकही नव्या सुनेला आशिर्वाद द्यायला आवर्जून येत होते. पण हसतं खेळतं घर अचानक लग्नाच्या तिसऱ्या दिवशी शांत झालं. नव्या सुनेने केलेल्या प्रतापामुळे लग्नघरात शोककळा पसरली. हरियाणातील रेवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली.
पोलिस स्टेशनमध्ये तक्रार
नववधूचा हा प्रताप जवळच लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी पीडित कुटुंबियांनी अखेर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. तिच्यासोबत तिने घरातील मौल्यवान वस्तू, लाखो रुपयांचे दागिनेही पळवून नेले. या संपूर्ण प्रकरणामुळे घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. . यापोलिसांनी तपासासाठी पीडित कुटुंबाच्या घरी पोहोचून सीसीटीव्ही ताब्यात घेतला असून त्या फुटेजमधून काही सुगावा मिळतो का याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलीस नववधूच्या शोधात व्यस्त आहेत मात्र तिने हे पाऊल का उचलले हे अद्याप कोणालाच समजलेले नाही. लुटारू वधूला लवकरात लवकर पकडण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.