पाटणा: पाटणाजवळील फतुहा पोलीस स्टेशन (Crime News) परिसरातून एक धक्कादायक घटना (Patana News) समोर आली आहे. एका तरुणीला दोन तरुणांनी जबरदस्ती हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर पीडित तरुणी थेट पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एक थार कार आणि 5 मोबाईल फोन जप्त केले आहेत. (Latest Breaking News)

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडिता पाटणा शहरात कुटुंबासोबत राहते. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे चुन्नू कुमार आणि सुधांशू कुमार अशी आहेत. डीएसपी 1 अवधेश कुमार यांनी सांगितले की, पीडितेची ओळख सहा महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर चुन्नू कुमारशी झाली होती. दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यातून प्रेमसंबंध सुरू झाले.
मात्र काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात वाद सुरू होते. हे मतभेद मिटवण्यासाठी सोमवारी चुन्नूने तरुणीला मंदिराजवळ भेटायला बोलावले. त्यानंतर त्याने तिला जबरदस्तीने चारचाकीत बसवून हॉटेलमध्ये नेले. गाडीत चुन्नूचे आणखी तीन मित्रही होते. हॉटेलमध्ये जाण्यास तरुणीने नकार दिल्यावर तिला जबरदस्तीने खोलीत नेण्यात आले. चुन्नूचे मित्र बाहेर पहारा देत उभे राहिले. खोलीत चुन्नू आणि त्याचा मित्र सुधांशू या दोघांनी तरुणीवर अत्याचार केला.
या घटनेनंतर पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली आणि दोघांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमने हॉटेलमधील खोलीची तपासणी करून संबंधित नमुने गोळा केले आहेत. खोली सध्या सील केली असून पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सर्व आरोपींची न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे आणि प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







