बंगळुरु : गेल्या काही वर्षापासून ऑनलाईन खरेदी करणा-यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. अनेक लोक विविध प्रकराच्या गोष्टींची ऑनलाईन खरेदी करत असतात. त्यामुळे अनेकजण वेळेची बचत आणि धावपळ होऊ नये यासाठी घरबसून ऑनलाईन शॉपिंग करत आहेत. तसाच एक प्रकार बंगळुरू येथे घडला आहे. बंगळुरू येथील एका जोडप्याने ऑनलाइन एक वस्तू ऑर्डर केली होती. पण त्या ऑर्डर केलेल्या वस्तूमध्ये जिवंत कोब्रा आढळला आहे. ही घटना रविवारी घडली आहे.
Karnataka | A couple from Bengaluru found a spectacled cobra in their Amazon package containing an Xbox controller. The snake was stuck to the packaging tape.
(Source: Screengrabs from a viral video) pic.twitter.com/cf69RxuyW7
— ANI (@ANI) June 19, 2024
जोडप्यानीं सांगितलं की, त्यांनी एक्सबॉक्स कंट्रोलरची ऑनलाइन ऑर्डर दिली होती. पण त्यांना पॅकेटमध्ये जिवंत कोब्रा दिसल्याने धक्का बसला. सुदैवाने हा कोब्रा पॅकेजिंग टेपमध्ये अडकला होता. या कारणामुळे तो कोणालाही चावू शकला नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ या जोडप्याने बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी ते म्हणाले, ‘आम्ही दोन दिवसांपूर्वी अॅमेझॉन वरून एक्सबॉक्स कंट्रोलरची ऑर्डर दिली आणि पॅकेजमध्ये एक जिवंत कोब्रा सापडला. डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीने पॅकेज थेट आमच्याकडे दिलं. आम्ही सर्जापूर रोडवर राहतो आणि संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे.
सुदैवाने तो कोब्रा पॅकेजिंग टेपला चिकटला होता आणि आमच्या घरातील कोणालाही इजा झाली नाही. एवढा मोठा धोका असूनही अॅमेझॉन ग्राहक सेवेने आम्हाला 2 तास स्वतः परिस्थिती हाताळण्यास सांगितले. आम्हाला मध्यरात्री एकट्याने परिस्थिती हाताळण्यास भाग पाडले. ई-कॉमर्स कंपन्यांनी त्यांचं पॅकेजिंग आणि वितरण प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी या घटनेनंतर केली जात आहे.
ग्राहकाच्या व्हिडिओला प्रतिसाद देत कंपनीने ट्विट केलं की, ‘तुमच्या अॅमेझॉन ऑर्डरमुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमा मागतो. आम्ही त्यात लक्ष घालू. कृपया आवश्यक माहिती येथे शेअर करा आणि आमची टीम तुमच्याशी संपर्क साधेल. अपडेट घेऊन लवकरच तुमच्याशी बोलू.