नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांना गृह मंत्रालयाकडून निमलष्करी दलाकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. आयबीच्या थ्रेड पर्सेप्शन रिपोर्टच्या आधारे काँग्रेस अध्यक्षांना सीआरपीएफची झेड प्लस श्रेणी सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. सीआरपीएफचे एकूण 58 कमांडो मल्लिकार्जुन खर्गे यांना 24 तास सुरक्षा पुरवतील. काँग्रेस अध्यक्षांना देशभरात झेड प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात येणार आहे.
Z Plus सुरक्षा म्हणजे काय?
झेड प्लस सुरक्षेमध्ये सामान्यतः 55 कर्मचारी असतात, ज्यात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक कमांडो आणि पोलिस कर्मचारी असतात. सर्व आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत. संघातील प्रत्येक सदस्य मार्शल आर्ट्स आणि नि:शस्त्र लढाऊ कौशल्यांमध्ये तज्ञ आहे. देशातील सुमारे 40 व्हीआयपींना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.