पुणे प्राईम न्यूज: क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने क्लॉडिया गोल्डिन यांना अल्फ्रेड नोबेलच्या स्मरणार्थ 2023 चा अर्थशास्त्रातील स्वेरिगेस रिक्सबँक हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. वुमेन्स लेबर मार्केट परिणामांबद्दल समाजाचे ज्ञान विकसित केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, क्लॉडिया गोल्डिन हा पुरस्कार जिंकणारी केवळ तिसरी महिला आहे. यापूर्वी सन्मानित करण्यात आलेल्या 92 अर्थशास्त्र पुरस्कार विजेत्यांपैकी केवळ दोन महिलांना हा पुरस्कार देण्यात आला होता. क्लॉडिया गोल्डिन हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
इकॉनॉमिक सायन्सेस पुरस्कार समितीचे अध्यक्ष जेकब स्वेन्सन म्हणाले की, लेबर मार्केटमध्ये महिलांची भूमिका समजून घेणे समाजासाठी खूप महत्वाचे आहे. क्लॉडिया गोल्डिन यांच्या संशोधनाद्वारे, आपण महिलांना अडथळा आणणाऱ्या घटकांबद्दल जाणून घेऊ शकतो आणि भविष्यात या अडथळ्यांवर मात करू शकतो.
BREAKING NEWS
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2023 Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel to Claudia Goldin “for having advanced our understanding of women’s labour market outcomes.”#NobelPrize pic.twitter.com/FRAayC3Jwb— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2023
नोबेल पारितोषिक सेंट्रल बँक ऑफ स्वीडनने 1968 मध्ये सुरू केले आणि ते औपचारिकपणे अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिले जाते. हे आर्थिक विज्ञानातील बँक ऑफ स्वीडन पारितोषिक म्हणून ओळखले जाते. गेल्या वर्षी हे पारितोषिक फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष बेन बर्नान्के, डग्लस डब्ल्यू. डायमंड आणि फिलिप डायबविग यांना मिळाले होते. बँकेच्या अपयशावर त्यांनी संशोधन केले. या संशोधनामुळे 2007-2008 मध्ये अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर येण्यास मदत झाली.
हेही वाचा:
घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात एक हजारांची वाढ
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला