Breaking News : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्याची बातमी समोर आली आहे. इम्फाळ पूर्वेच्या खमेनलोक भागामध्ये मध्यरात्री हिंसाचार झाला. हिंसाचारादरम्यान करण्यात आलेल्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू तर दहा जण जखमी झाले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी हिंसाचारात होरपळलेला मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला आहे. याबाबत इंफाळ पूर्वचे पोलीस अधीक्षक शिवकांता सिंग यांनी एएनआयला माहिती दिली.
रात्री उशिरा झालेल्या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू , तर 10 जण जखमी
माहितीनुसार, खामेनलोक भागात रात्री उशिरा झालेल्या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी इंफाळला नेण्यात आले आहे. (Breaking News) हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी काहींच्या अंगावर जखमांच्या खुणा आहेत आणि अनेकांना गोळ्या लागल्या आहेत. मणिपूरमध्ये जातीय संघर्षांमुळे एका महिन्यापेक्षा जास्त काळ तणावपूर्ण आहे.
एक महिन्यापूर्वी मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायाच्या लोकांमधील वांशिक हिंसाचारात किमान १०० लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि ३१० जण जखमी झाले होते. (Breaking News) मणिपूरच्या १६ पैकी ११ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू आहे, तर संपूर्ण ईशान्येकडील राज्यात इंटरनेट सेवा बंद आहे.
मणिपूरमध्ये 3 मे पासून कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. मेईतेई समुदायाचे लोक असा युक्तिवाद करतात की 1949 मध्ये भारतीय संघराज्यात विलीन होण्यापूर्वी त्यांना संस्थानात जमातीचा दर्जा होता. (Breaking News) गेल्या 70 वर्षांत, मेईतेई लोकसंख्या 62 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. मेईतेई समाज आपल्या सांस्कृतिक ओळखीसाठी आरक्षणाची मागणी करत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Breaking News : मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू न देण्याचा इशारा ; वाद चिघळणार??