Breaking News : नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ब्रिटिशांनी लादलेला राजद्रोहाचा कायदा रद्द करण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सरकार भारतीय दंडविधानातील राजद्रोहाचा कायदा पूर्णपणे रद्द करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ब्रिटिशांनी लादलेला राजद्रोहाचा कायदा अखेर रद्द होणार आहे. भारतीय कायदा न्याय प्रक्रियेतील तीन महत्त्वाचे कायदे बदलण्यासाठीची विधेयके केंद्र सरकारने आज लोकसभेत मांडली. त्यानुसार दंड संहिता १८६० च्याऐवजी भारतीय न्याय संहिता, २०२३ हा कायदा आणण्याचा प्रस्ताव सरकारने लोकसभेत मांडला आहे.
दंड संहिता १८६० च्याऐवजी भारतीय न्याय संहिता, २०२३ आणण्याचा प्रस्ताव
नव्या विधेयकानुसार आता राजद्रोहाऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाणार आहे. जन्मठेपेची शिक्षेचा कालावधीही कमी करण्यात आला आहे. लोकसभेत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने हे विधेयक लोकसभेत मंजूर होईल. (Breaking News ) मात्र, राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेणे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. राजद्रोह आम्ही पूर्णपणे रद्द करत आहोत. इथे लोकशाही आहे, सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, असे यावेळी शहा म्हणाले.
केंद्र सरकारने भारतीय दंड संहिता, दंड प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा अधिनियमामध्ये दुरुस्तीसाठी लोकसभेत तीन विधेयक सादर केली आहेत. हे तिन्ही कायदे ब्रिटिश काळातील आहेत. सर्वांना न्याय मिळावा, हे आमचे लक्ष्य आहे. कुणाला शिक्षा ठोठावणे हे आमचे लक्ष्य नाही. पूर्वीचे कायदे ब्रिटिश सत्तेला बळ देण्यासाठी तयार केले होते. (Breaking News ) त्या कायद्याचा हेतू शिक्षा देणे हा होता, न्याय देणे नाही. आता तिन्ही कायदे भारतीय नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करतील, असेही शाह यांनी सांगितलं.
गेल्यावर्षी १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून पाच गोष्टी सांगितल्या होत्या. एक म्हणजे देशात गुलामीचे नामोनिशाण ठेवणार नाही हा होता. मी जे विधेयक आणलं आहे, त्याद्वारे मोदींचे हे वचन पूर्ण होत आहे, असे अमित शाह म्हणाले. (Breaking News ) नवीन विधेयकात राजद्रोहाचे नाव काढून टाकण्यात आले आहे. काही बदलांसह कलम १५० अंतर्गत तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. तसेच गुन्ह्याची व्याप्ती वाढविली गेली आहे, असेही शहा म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : भिगवणमध्ये हॉटेल व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार ; परिसरात प्रचंड खळबळ