Hemant Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा दिला आहे. झारखंडमधील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. झारखंड उच्च न्यायालयाने हा निर्णय आज (दि.२८ जून) दिला आहे. हेमंत सोरेन हे प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्यानं त्यांना जामीन मंजूर केल्यास ते चौकशीवर प्रभाव पाडू शकतात, असं म्हणत ईडीनं जामिनाला विरोध केला होता.
हेमंत सोरेन यांनी अटकेची कारवाई ही बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. राजकीय सूड भावनेतून अटक करण्यात आल्याचं हेमंत सोरेन यांनी म्हटलं होतं. हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केल्यानंतर झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी दिला होता. झारखंड मुक्ती मोर्चाला देखील हेमंत सोरेन यांना जामीन मिळाल्यानं दिलासा मिळणार आहे.