Big News : नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने 2024 ते आर्थिक वर्ष 2031 दरम्यान एकूण 1.25 लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची योजना आखली आहे. यामध्ये 45,000 कोटी रुपये उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी खर्च करण्यात येणार असून, दरवर्षी 20 लाख वाहनांची भर पडणार आहे.
1.25 लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची योजना
आर्थिक वर्ष 2031 पर्यंत विक्री साखळीचा विस्तार, सेवा आणि सुटे भागांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, निर्यात क्षमता सुधारणे, संशोधन आणि विकास इत्यादींवर सुमारे 80,000 कोटी रुपये खर्च केले जातील. सध्या मारूती उत्पादन क्षमता 22.5 लाख वाहने आहे. त्यापैकी गुजरात प्लांटमध्ये सुमारे 7.5 लाख वाहने तयार केली जातात. मारुतीचा गेल्या आठ वर्षांत म्हणजे आर्थिक वर्ष 2016 ते 2023 या कालावधीत एकूण भांडवली खर्च सुमारे 27,538 कोटी रुपये आहे.
कंपनीने आपल्या भागधारकांना आणि विश्लेषकांना सुझुकी मोटर कॉर्पोरेशनसोबत सध्या मारुतीची शेअर स्नॅप डील समजावून सांगताना म्हटले, कंपनीने गुजरात प्लांट ताब्यात घेण्यासाठी आपल्या मूळ कंपनीसोबत हा करार केला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, देशात मारुतीची विक्री 16.1 लाख वाहनांवर पोहोचली, जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 21.1 टक्क्यांनी अधिक होती. एकूण निर्यातही 8.8 टक्क्यांनी वाढून 2.6 लाख वाहनांवर पोहोचली आहे.