नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आज रविवार, 28 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील मुख्यालयात वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) पार पडली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, माजी क्रिकेटपटू मिथुन मन्हास यांची बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

रॉजर बिन्नी यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी जागा रिकामी झाली होती. या रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी मिथुन मन्हास यांनी अर्ज दाखल केला होता. आज त्यांच्या नावावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाला असून, मागील अध्यक्ष सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी यांच्याप्रमाणेच, मिथुन मन्हास यांचीही ही निवड बिनविरोध झाली आहे. तसेच या बैठकीत राजीव शुक्ला यांची बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत मिथुन मन्हास?

मिथुन मन्हास यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1979 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील भालेसा येथे झाला. त्यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये लक्षणीय यश मिळवले आहे. मात्र, त्यांनी टीम इंडियासाठी कधीही आंतरराष्ट्रीय पदार्पण केले नाही. मन्हास यांनी त्यांच्या क्रिकेट करिअरमध्ये 27 शतक आणि 49 अर्धशतक झळकावले आहेत. इतकच नव्हे, तर टी-20 च्या 91 सामन्यांमध्ये त्यांनी 1170 धावांचा डोंगर रचला होता. मन्हास यांनी जम्मू काश्मीर आणि दिल्लीच्या संघाचंही प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी आयपीएलमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. ते पुणे वॉरियर्स, दिल्ली आणि सीएसकेच्या संघासाठी खेळले होते.







