Big News : केरळ : केरळच्या एर्नाकुलम येथील योहावा ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी (ता. २९) एकापाठोपाठ एक असे तीन साखळी स्फोट झाले आणि एकच गोंधळ उडाला. या स्फोटांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून, सुमारे ३६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हे स्फोट झाले.
मुंबई, पुण्यातही हायअलर्ट
पोलिसांना घटनास्थळावर स्फोटात वापरलेल्या तारा, बॅटरी आणि इतर संशयास्पद वस्तुही सापडल्या आहेत. हा बॉम्ब टिफिन बॉक्समध्ये ठेवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. (Big News) कन्व्हेन्शन सेंटरमधील तीन दिवसीय कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस होता. स्फोट झाला तेव्हा सभागृहात दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. एकापाठोपाठ एक ३ ते ४ स्फोट झाले. यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत.
एका दिवसापूर्वी येथील कॅथलिक चर्चने हमासचा निषेध केला होता. तसेच केरळमधील सभेत हमासचे माजी प्रमुख ज्या पद्धतीने बोलतात आणि त्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जातात, ते योग्य नाही. (Big News) दहशतवाद्यांचा गौरव होता नये, असे चर्चने म्हटले होते. त्यानंतर प्रार्थना सभेदरम्यान चर्चवरच हल्ला करण्यात आला. केरळमधील मलप्पुरममध्ये जमात-ए-इस्लामीच्या सहयोगी संघटनेने हमासच्या समर्थनार्थ रॅली काढली होती.
दरम्यान, केरळमधील स्फोटानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून, शहरात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करत आहेत. सर्व संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यात आली आहे. (Big News) कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पूर्णपणे काळजी घेतली आहे. दिल्लीहून एनएसजी बॉम्बशोधक पथकही केरळला रवाना झाले आहे. एनएसजीच्या या टीममध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
स्फोटानंतर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सगळीकडे आग आणि धूर दिसत आहे. स्फोट कसा झाला, कोणी घडवला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Big News) या घटनेबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए तपासाला सुरुवात करणार आहे. गृहमंत्र्यांनी एनआयएला घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या स्फोटाकडे दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने पाहिले जात आहे. रविवारच्या प्रार्थनेवेळी चर्चमध्ये हजारो लोक उपस्थित होते. या वेळी तेथे काही ज्यू उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे. (Big News) केरळमधील हमासच्या रॅलीमध्ये अनेक आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली होती. हमासच्या नेत्याने केवळ ज्यूंविरोधातच नव्हे, तर हिंदूंविरोधातही विधाने केली.
केरळमध्ये ९ वाजून ४० मिनिटांनी ज्रमा इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये स्फोट झाला. रविवारी या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस होता. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी सर्व शक्यता तपासून पाहत आहेत. जे लोक यामागे आहेत, त्यांना कडक शिक्षा केली जाईल. (Big News) हा स्फोट आईडी डिव्हाईसने केल्याचे प्राथमिक तपासात समजले आहे. शांतता प्रस्थापित करण्याची मी विनंती करत आहे आणि सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची हेट पोस्ट टाकू नका.
शेख दरवेश, पोलीस महासंचालक, केरळ
स्फोटाची घटना ऐकून धक्का बसला आहे. याचा मी स्पष्ट निषेध करतो आणि तातडीने पोलीस कारवाईची मागणी करतो. मात्र, हे एवढे पुरेसे नाही. आपल्या राज्यात अशी घटना होणे दु:खद आहे. (Big News) मी सर्व धर्मगुरुंना विनंती करतो की त्यांनी घटनेची निंदा करावी आणि सगळ्यांना सांगावे की हिंसेने काही साध्य होईल तर ते फक्त हिंसा बाकी काही नाही.
शशी थरूर, खासदार, तिरुवनंतरपुरम
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big News : रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी ; आधारकार्डशिवाय ‘नो एन्ट्री’,
Big News : मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी ; २० कोटी रुपयांची मागणी