मध्य प्रदेश: भारतात लग्नासाठी किमान वयाची मर्यादा आहे पण कमाल वयाची नाही. त्यामुळे माणूस वयाच्या कितव्याही वर्षी लग्न करू शकतो. पण आता सगळ्यांना हादरवणारी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशात एका 103 वर्षाच्या म्हाताऱ्याने लग्न केले आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याने हॅट्रीक केली आहे. त्यामुळे एखादेवेळेस बाई एकटी राहू शकते पण माणूस एकटा नाही राहू शकत हे पुन्हा अदोरेखीत झाले आहे.
तर वधूची ही लग्नाची दुसरी वेळ आहे. या दोघांनी एकमेकांशी विवाह करण्यामागे त्यांची स्वत:ची काही कारणे आहेत. कोण आहेत हे गृहस्थ? कोण आहे त्यांची वधू? याबद्दल जाणून घेऊया.
मध्य प्रदेशाची राजधानी भोपालमध्ये निकाह झाला आहे. खरतर हे लग्न 2023 मध्ये झाले होते पण याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. यातील वर हा 103 वर्षांचा तर वधू 49 वर्षांची आहे. हबीब नजर असे 103 वर्षांच्या वराचे नाव आहे. हबीब हे भोपाळमधील स्वतंत्रता सेनानी असून ते तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकत आहेत. गेल्यावर्षी त्यांचे लग्न झाले होते. पण आता त्यांचा निकाहाची गोष्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे 103 वर्षाच्या नवरदेवाची चर्चा चौकाचौकात होऊ लागली आहे.
हबीब नजर हे भोपाळच्या इतवारामध्ये राहतात. त्यांचे पहिले लग्न नाशकात झाले होते तर दुसरे लग्न लखनौमध्ये झाले होते. पण काही दिवसांपूर्वीच त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे वृद्धापकाळाने निधन झाले. यानंतर हबीब दुखातून सावरु शकले नाहीत. त्यांना पुढचे आयुष्य एकट्याला काढावे लागणार होते, जे त्यांच्यासाठी फार वेदनादायी होते. आपला एकटेपणा घालवण्यासाठी त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला.
फिरोज जहॉं असे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव आहे. फिरोज यांच्या पतीचेदेखील निधन झाले होते. त्यामुळे त्यादेखील एकट्या आयुष्य व्यतीत करत होत्या. हबीब यांच्याकडे लक्ष द्यायला कोणी नव्हत म्हणून मी या लग्नाला होकार दिल्याचे फिरोज सांगतात. प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. ते हबीब आणि फिरोज यांच्या बाबतीत खरं वाटू लागलंय.