Bank Holidays : यावर्षी सोमवारी ख्रिसमस सण साजरा केला जाणार असून डिसेंबरमध्ये ख्रिसमस असल्याने देशभरातील बँकांना सुट्ट्या असणार आहेत. सलग पाच दिवस बँका बंद राहणार आहेत. चौथ्या शनिवारमुळं 23 डिसेंबरला म्हणजे उद्या बँका बंद राहणार आहेत. सेंट्रल रिझव्र्ह बँकेच्या बँक हॉलिडे लिस्टमध्ये वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीनुसार वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या आहेत. त्यामुळे बँका अनेक दिवस बंद राहू शकतात, तसेच शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही त्यात समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये ख्रिसमसमुळं बँकांना सलग पाच दिवस सुट्टी असणार आहे. यावर्षीचे फक्त नऊ दिवस उरले असून यापैकी काही राज्यांमध्ये सात दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल तर ते आजच करा. तुम्हाला नंतर अडचणींचा सामना करावा लागणार नाही. कोणत्या राज्यांमध्ये बँक बंद राहणार हे जाणून घेऊयात.
सलग ५ दिवस बँका राहणार बंद
यावेळी चौथा शनिवार असल्यानं 23 डिसेंबर रोजी देशभरातील बँकांना सुट्टी असेल. यानंतर रविवार आहे. ख्रिसमसनिमित्त सोमवारी देशभरातील बँका बंद राहणार आहेत. 26 आणि 27 डिसेंबरला अनेक राज्यांमध्ये ख्रिसमसच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असेल. अशा स्थितीत पाच दिवसांच्या सुट्टीमुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. समस्या टाळण्यासाठी, राज्यांनुसार सुट्ट्यांची यादी पाहून तुम्ही बँकेत जाण्याचे नियोजन करू शकता.
या दिवशी बँका राहणार बंद
- 23 डिसेंबर 2023
- 24 डिसेंबर 2023
- 25 डिसेंबर 2023
- 26 डिसेंबर 2023
- 27 डिसेंबर 2023
- 30 डिसेंबर 2023
- 31 डिसेंबर 2023