Bangluru news : बंगळुरू : चांद्रयान-३ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम अखेर यशस्वी झाली आहे. भारतीय अंतराळ एजन्सीसाठी शनिवारचा अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला आहे. चांद्रयानाने शनिवारी संध्याकाळी पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. एवढेच नव्हे तर चंद्राच्या कक्षेत जाताच चांद्रयानाने इसरोला महत्त्वाचा संदेशही पाठवला. यामुळे हा हर्षाचा दिवस मानला जात आहे.
इसरोतील संशोधकांचा आनंदोत्सव
चांद्रयान-३ ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. या मोहिमेच्या यशामुळे भारत चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला आहे. आतापर्यंत अमेरिका, रशिया आणि चीनने हा पराक्रम केला होता. कोणत्याही अडथळ्यांशिवाय चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे. (Bangluru news) चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर यानाने एक महत्त्वाचा संदेश पाठवला आहे. मला चंद्राचे गुरुत्वाकर्षण जाणवत आहे, असा संदेश यानाकडून इसरोला आला आहे.
दरम्यान, हा संदेश आल्यानंतर इसरोतील संशोधकांनी आनंदोत्सव साजरा केला. कारण या संदेशामधून चांद्रयान-३ सुखरूप चंद्राच्या परिघात पोहोचल्याचे स्पष्ट झाले. तसेच चंद्रावरील वातावरणाची माहितीही या संदेशाद्वारे मिळाली आहे.
दरम्यान, इसरोने सॅटेलाईटमधून आलेला संदेश शेअर केला आहे. एमओएक्स, इस्ट्रॅक, हे चांद्रयान -३ आहे. मला चंद्रावरील गुरुत्वाकर्षण जाणवत आहे. (Bangluru news) आम्ही चंद्राच्या कक्षेत पोहोचलो आहोत, असं या संदेशात म्हटलं आहे. मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स, इसरो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क, बंगळुरूकडून हे यान लॉन्च केलं गेलं होतं.
पुढील मिशनद्वारे चांद्रयान -३ चा परिघ कमी केला जाणार आहे. रविवारी ही प्रक्रिया सुरू केल्यानंतर १७ ऑगस्टपर्यंत आणखी तीन ऑपरेशन होतील. (Bangluru news) त्यानंतर रोवर प्रज्ञानसह लँडिंग मॉड्यूल विक्रम यानाच्या प्रपल्शन मॉड्यूलपासून वेगळा होईल. त्यांतर लँडर डी-आर्बिटिंगची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं इसरोने म्हटलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : चक्क झुरळांमुळे पुणे स्थानकावर दोन तास रेल्वेचा खोळंबा!
Pune News : कारच्या काचेवर चिठ्ठी लावून १० लाखांची खंडणी मागणार्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक
Pune News : कारच्या काचेवर चिठ्ठी लावून १० लाखांची खंडणी मागणार्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक