Pune Prime News : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातून एक मोठी दुर्घटना समोर येत आहे. काल शनिवारी उत्तरकाशी जिल्ह्यात एका निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत तब्बल ३६ मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दलची माहिती मिळालेली नसल्याचं बोललं जात आहे.
अधिक माहिती अशी की, उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ब्राह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्याराहून डंडालगावपर्यंत जाणाऱ्या एका निर्माणाधीन बोगद्याचा तब्बल ५० मीटरपर्यंतचा भाग कोसळला असून यामध्ये तब्बल ३६ मजूर बोगद्यात अडकल्याचं बोललं जात आहे. अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बचाव कार्य सुरू केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार भूसंकलनामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. दरम्यान अद्याप कोणत्याही जीवितहानीबद्दलची माहिती मिळालेली नाही.
बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुरक्षित
उत्तरकाशीचे पोलीस अधीक्षक अर्पण यदुवंशी यांनी सांगितले की, या बोगद्यात अडकलेले सर्व कामगार सुरक्षित असून त्यांच्याकडे ऑक्सिजन सिलेंडरदेखील आहेत. त्याचबरोबर एक ऑक्सिजन पाईपही बोगद्यात पोहोचवली आहे. जिल्हा प्रशासनाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचाव बचावकार्य सुरु केलं आहे. पुढे बोलताना म्हणाले, बोगद्याच्या बाहेर पाच रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या असून मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जात येईल.
तसेच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करता यावेत यासाठी वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वात पोलीस, एसडीआरएफ, एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून खोदकाम करण्यासाठी ड्रिलिंग मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे.
मजुरांना बाहेर काढण्यासाठी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता
निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या सर्व मजुरांना बाहेर काढण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
#WATCH | Uttarakhand: A part of the tunnel under construction from Silkyara to Dandalgaon in Uttarkashi, collapsed. DM and SP of Uttarkashi district are present at the spot. SDRF, and Police Revenue teams are also present at the spot for relief work. Rescue operations underway. pic.twitter.com/hxrGqxWrsO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 12, 2023
बातमी अपडेट होत आहे..