Pune Prime News : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात १९ नोव्हेंबर ला पोलिसांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अन्य एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी आहे. संबंधित पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झुंझुनू येथील निवडणूक रॅलीसाठी व्हीआयपी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं होतं. ते सर्वजण नागौर येथून कार्यक्रमस्थळाकडे जात होते.
दरम्यान, चुरू जिल्ह्यातील बागसारा गावाजवळ भरधाव वेगाने जाणारी पोलिस कर्मचाऱ्यांची कार ट्रकला धडकली. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला असून तीन पोलीस जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झुंझुनू येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. नागैरी जिल्ह्यातील खिंवसर पोलिस ठाण्याचे हे सर्व पोलीस कर्मचारी मोदी यांच्या सभेच्या ड्युटीसाठी निघाले होते. दरम्यान, चुरू जिल्ह्यातील बागसारा गावाजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. रस्त्यात दाट धुकं असल्याने पोलिसांची कार ट्रकला जोराची धडकली.
या दुर्घटनेत पाच पोलिसांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य एका जखमी पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितलं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अडकलेल्या मृत पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. अपघातानंतर बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.(Accident News)