आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भीषण अपघात घडल्याची घटना समोर येत आहे. शाळकरी मुलांना घेऊन जाणारी रिक्षा आणि ट्रक यामध्ये हा अपघात झाला आहे. बुधवारी सकाळी ही भयंकर घटना घडली आहे. या अपघातात आठ लहान मुले जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाखापट्टणम येथील संगम सैराट चित्रपटगृहाजवळ आज सकाळी शाळेत घेऊन जात असताना ऑटो-रिक्षा आणि लॉरी ट्रकची जोरदार धडक झाली. या धडकेत रिक्षा पलटी होऊन शाळकरी मुलं रस्त्यावर पडतात. या घटनेत आठ मुलं जखमी झाली आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेत जखमी मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.
नेमका कसा घडला अपघात?
विशाखापट्टणममधील एका उड्डाणपुलाखालील चौकात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी रिक्षा आणि ट्रक यांच्यात हा अपघात झाला. आज सकाळी 7 वाजून 36 मिनिटांनी हा अपघात झाला आहे . उड्डाणपुलाखालील रस्त्यावरुन भरधाव वेगात ट्रक येत असतानाच दुसऱ्या बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या शाळकरी मुलांना घेऊन जात असलेल्या रिक्षाने ट्रकला जोरदार धडक दिली. रिक्षा इतक्या वेगात होती की ट्रकला धडक दिल्यानंतर रिक्षातील मुलं रस्त्यावर पडली.
#WATCH | Andhra Pradesh: Eight school children were injured in an accident when an auto collided with a lorry near Sangam Sarat Theatre in Visakhapatnam
Source: CCTV Footage from a local shop pic.twitter.com/sr9xaadUVo
— ANI (@ANI) November 22, 2023