Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेपर लीकला कायमचा ब्रेक? संसदेत अँटी-पेपर लीक विधेयक मंजूर; नियम होणार आणखी कठोर

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 31 July 2026, 8:36

नवी दिल्ली: देशातील सार्वजनिक परीक्षांमध्ये होणारी पेपरफुटी, कॉपी आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या ‘पब्लिक एक्झामिनेशन्स (प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स) दुरुस्ती विधेयक, 2026’ ला राज्यसभेची मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले होते. दोन्ही सभागृहांची संमती मिळाल्यानंतर या विधेयकाला संसदेची अंतिम मान्यता मिळाली आहे.

या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणताही तडजोड होऊ दिली जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मोदी म्हणाले की, अनेक वर्षांपासून देशातील विविध राज्यांमध्ये पेपरफुटीच्या घटना समोर येत आहेत. अशा घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते आणि त्यांच्या करिअरवर परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रकारांना कायमचा आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता होती.

परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये फास्ट ट्रॅक तपास व्यवस्था, विशेष टास्क फोर्स, राज्य सरकारांशी समन्वय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर भर दिला जात आहे. परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी प्रत्येक स्तरावर बदल केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले की, पेपरफुटी करणारे माफिया, संघटित टोळ्या किंवा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही सरकार माफ करणार नाही. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल.

पहा व्हिडीओ:

Parliament passes a Bill that makes our examination system more robust! pic.twitter.com/OEvLKXoUaf

— Narendra Modi (@narendramodi) July 30, 2026

राज्यसभेतील चर्चेदरम्यान केंद्र सरकारने परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण कायम असल्याचे स्पष्ट केले. या विधेयकात पेपरफुटी आणि संघटित कॉपीच्या प्रकरणांमध्ये कठोर शिक्षा, जलद तपास आणि वेगवान न्यायप्रक्रियेच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

सरकारचे प्रयत्न केवळ कायदा करण्यापुरते मर्यादित नसून, देशात दीर्घकालीन आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था उभी करण्यासाठी सुधारणा पुढेही सुरू राहतील, असे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच विकसित भारताच्या उद्दिष्टासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

कारचा त्रास, पार्किंगची चिंता संपली! मुळशी-ताम्हिणी घाट सफरीसाठी PMPMLची स्पेशल बस; कमी खर्चात पूर्ण ट्रिपचा आनंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp