गुजरात : येथील एका सोसायटीच्या आवारात सायकल चालवणाऱ्या मुलीच्या अंगावरुन कार गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
दिशा पटेल (वय 4) असे या मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील मेहसाणाच्या स्पर्श व्हिला सोसायटीत एक मुलगी सायकल चालवत होती. सायकल चालवत असतांना तिचा अचानक तोल गेल्याने ती खाली पडली. याच वेळी समोरुन येणारी एक कार तिच्या अंगावरून गेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
#WATCH | गुजरात के मेहसाणा स्थित स्पर्श विला सोसाइटी में एक चार साल की बच्ची साइकिल चला रही थी। अचानक कार को करीब आता देख बच्ची साइकिल से गिर गई। बच्ची के गिरने के बाद कार उसे कुचलते हुए आगे बढ़ गई। इस हादसे में बच्ची की मौत हो गई।#Gujarat #Mehsana pic.twitter.com/xVVGBr1kG7
— Hindustan (@Live_Hindustan) August 19, 2024
व्हायरल होणा-या व्हिडिओमध्ये चिमुकली ही सोसायटीच्या आवारात सायकल चालवत असल्याचे दिसत आहे. ती सायकल वळवण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणारी कार पाहून घाबरून तिचा तोल गेला. यामुळे मुलगी सायकलवरून खाली पडली. यावेळी कार चालकाने ब्रेक लावण्याऐवजी गाडी पुढे दाबली. यावेळी गाडी मुलीच्या अंगावरून गेली. थोड्या वेळाने चालकाने गाडी थांबवली. या नंतर चालक गाडीतून उतरून मुलीला बघायला गेला. पण, तो पर्यत त्या चिमुकलीचा जीव गेला होता.
दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली आहे. कार चालवणाऱ्या व्यक्तीबाबत अद्याप काहीही समजू शकलेली नाही.