पुणे प्राईम न्यूज: रशिया-यु्क्रेन युद्धानंतर जगाला पुन्हा आणखी एका युद्धाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. इस्रायलनने पॅलेस्टाईनमधील हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर युद्धाची घोषणा केली आहे. त्यामुळे गाझा पट्टी व आसपासच्या भागात या युद्धाचे तीव्र परिणाम दिसणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या भूमीवर हमासच्या दहशतवाद्यांकडून कारवाया केल्या जात असल्याचे दावे केले जात होते. हे दहशतवादी मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं. शनिवारी सकाळी इस्रायलच्या भूमीवर गाझा पट्ट्यातून हजारो रॉकेट लाँच करण्यात आले. त्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणावर गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा केली.
हमास अतिरेक्यांनी शनिवारी पहाटे गाझा पट्टीवर हल्ला केला. सर्वप्रथम त्यांनी हजारो रॉकेट इस्रायलवर डागले आणि नंतर सतत हल्ले करत त्यांनी इस्रायलमध्ये प्रवेश केला. काही अतिरेकी पॅराग्लायडरचा वापर करून इस्रायलमध्ये घुसले आणि त्यांनी दिसेल त्याला गोळ्या घातल्या. या अचानक मोठ्या प्रमाणावर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तातडीने तातडीची बैठक बोलावून देशात युद्धाची घोषणा केली आहे.
Israelis across the country—on Shabbat and the holiday of Simchat Torah—woke up to sirens sounding and Hamas firing rockets at them from Gaza this morning.
We will defend ourselves. pic.twitter.com/S9GN8fld4Y
— Israel Defense Forces (@IDF) October 7, 2023
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॅलेस्टाईनची अतिरेकी संघटना हमासने इस्रायलवर 5 हजारांहून अधिक रॉकेट डागले आहेत. पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी गाझा पट्टीतून इस्रायलवर हल्ला केला आणि त्यांच्या प्रदेशात प्रवेश केला.
इस्रायली लोकांना घरी राहण्याचे आदेश
सीएनएननुसार रॉकेट हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तेल अवीवमध्ये उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. देशातील सर्व नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे. सर्वांना घरातच राहण्यास सांगितले आहे .हमासच्या हल्ल्यानंतर माध्यमांसमोर आलेल्या इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे.
ते म्हणाले, “हमासच्या दहशतवाद्यांनी आज सकाळी एक गंभीर चूक केली आणि इस्रायलविरुद्ध युद्ध सुरू केले. इस्त्रायली सुरक्षा यंत्रणांचे सैनिक सर्वत्र शत्रूशी लढत आहेत. मी इस्रायलच्या सर्व नागरिकांना सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करतो, असं देखील इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. इस्रायल हे युद्ध जिंकेल.” त्याचवेळी अमेरिकेने या हल्ल्यानंतर परिस्थितीवर सतत नजर ठेवत असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा:
अजित पवार गटासोबत असणारे बेचाळीसावे आमदार नवाब मलिक? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
भाजप नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू
टीम इंडियाने जिंकले सुवर्ण, आशियाई स्पर्धेत पुरुष क्रिकेट संघाची गोल्डन कामगिरी