वसई (मुंबई) : पश्चिम रेल्वेच्या वैतरणा रेल्वे स्टेशनच्या पुढे काही अंतरावर एका अज्ञात व्यक्तीने मालगाडीच्या सहाय्यक लोकोपायलटला दगड मारल्याने लोकोपायलट जखमी झाला आहे. उपचारासाठी त्यांना वसईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रविवारी15 ऑक्टोबरला गुजरातच्या बलसाड रेल्वे स्टेशनपासून ते वसई रेल्वे स्टेशनपर्यंत यूएनजीयू-केटीआयजी या ट्रेनमध्ये प्रवास करत होत्या. सुप्रिया अरविंद परोहा या सहाय्यक लोको पायलट शिंभू दयाल मिना यांच्यासोबत ड्युटीवर होते. गाडी वैतरणा रेल्वे स्टेशनवरून 7.55 ला सुटल्यानंतर काही किमी अंतर गेल्यानंतर ट्रॅकवर एक अनोळखी इसम हा पटरीच्यामध्ये उभे होता. या इसमाने गाडी जवळ येता असताना इंजिनवर जोरदार दगड फेकून मारला आणि तेथून निघून गेला. हा दगड इंजिनच्या लूक आऊट ग्लासला लागून, तो सहाय्यक लोको पायलट शिंभू मिना यांच्या गळ्याला लागला. तसेच काचेचे तूकडे त्यांच्या चेहऱ्याला आणि ओठाला लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांना लागलीच वसईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
लोकोपायलट सुप्रिया परोहा यांच्या तक्रारीवरून वसई रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात भारतीय रेल्वे ॲक्ट् 1989 कलम 152 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या रेल्वे पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.