नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय घेण्यासाठी मुदत वाढवून देण्याच्या विधिमंडळाच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाकडून वेळ वाढवून देण्यात आला आहे. आता अपात्रतेच्या निर्णयासाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान 31 डिसेंबर पूर्वी निर्णय करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले होते. मात्र, निकाल लेखनाला लागणारा वेळ लक्षात घेता तीन आठवड्यांची वेळ वाढवून द्या, अशी मागणी अध्यक्षांनी केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने तीन आठवड्यांचा वेळ न देता 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याचे राहुल नार्वेकरांच्या वकिलांनी मान्य केले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणीचा निर्णय 10 जानेवारीपर्यंत येईल असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 31 जानेवारी पर्यंतच्या निर्णयावर कोर्टाने कोणतेही भाष्य केलेले नाही. 10 जानेवारी किंवा 10 जानेवारीच्या आत शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी निर्णय येणार आहे. शिवसेना संदर्भातील निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना 10 जानेवारी ही डेडलाईन दिली आहे.