मुंबई: व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या 56 व्या वर्षी अखेचा श्वास घेतला आहे. बेडेकर हे लोणचे, मसाले व चटणी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील एक प्रतिष्ठित नाव आहे.
1910 मध्ये विश्वनाथ पर्शराम बेडेकर यांनी गिरगावात लहान किराणामालाचं एक दुकान सुरू केलं. या दुकानात त्यांनी मसाले आणि लोणचे ठेवण्यास सुरूवात केली. मसाले आणि लोणचे यांचा खप भरपूर व्हायला लागल्यावर त्यांनी दुकानांच्या शाखा काढायला सुरूवात केली. मुगभाट, दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची काही दिवसांतच पाच दुकाने झाली. पुढे धंद्याचा व्याप वाढत गेल्यावर 1943 मध्येच ‘व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड’ असं कंपनीचं नामकरण केले. बघता बघता या कंपनीने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला.
फक्त भारतात नाही तर ज्या ज्या देशात मराठी माणूस पोहचला तिथे तिथे बेडेकर यांची उत्पादनंही पोहचली. 1960 मध्ये भारतात प्रथम पी. पी. लीक प्रूफ कॅप्स बेडेकरांनी वापरल्या. आणि त्यानंतर मग लोणचं निर्यात होऊ लागलं. मुंबई जवळ असलेल्या कर्जतच्या फॅक्टरीत जवळपास 600 टन लोणचं प्रत्येक प्रत्येक सीझनला बनतं. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विक्री होते