मुंबई : काँग्रेसचे नेते आणि वांद्रे पूर्वचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला मुंबईमध्ये मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या घडीला त्यांनी पुढील वाटचालीबाबत काही सांगितलं नसलं तरी राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे.
बाबा सिद्दीकी यांनी म्हटले की, मी एक तरुण म्हणून काँग्रेसमध्ये आलो. हा ४८ वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. खूप काही गोष्टी आहेत, ज्या मला व्यक्त करायच्या आहेत. परंतु, काही गोष्टी न सांगितलेल्याच चांगल्या. त्या सर्वांचे आभार जे या प्रवासाचा भाग म्हणून माझ्यासोबत राहिले, असंही बाबा सिद्दीकी यांनी राजीनामा देताना म्हटले आहे.
I joined the Indian National Congress party as a young teenager and it has been a significant journey lasting 48 years. Today I resign from the primary membership of the Indian National Congress Party @INCIndia with immediate effect. There’s a lot I would have liked to express…
— Baba Siddique (@BabaSiddique) February 8, 2024