मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वकरांनी निकाल दिला. शिवसेना ही शिंदेची असल्याचं सांगत त्यांनी दोन्ही गटाच्या अपात्रतेच्या याचिका फेटाळल्या. त्यावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्ष कसा बदलावा हे सांगितलं. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांवर केली.
सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले, असं सांगत त्यांनी नार्वेकरांवरही आरोप केले. शिवसेना ही शिंदेंची कधीच होऊ शकत नाही, त्यांचा आणि शिवसेनेचा संबंध कधीच संपला आहे, त्यामुळे शिवसेना ही आमचीच आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्ष कसा बदलावा हे सांगितलं. आमची घटना जर अवैध असेल तर मग आमचे आमदार पात्र कसे काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
ते म्हणाले की, “स्वतः दोन तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्षांतर बंदी कायदा अधिक मजबूत करण्याऐवजी त्यांनी पक्षांतर कसे करावे याचा निर्णय दिला. विधानसभा अध्यक्षांना जे काही संरक्षण असतात त्याचा त्यांनी गैरवापर केला. शिवसेना कुणाची हे लहान मुलही सांगू शकतं.” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.