मुंबई: राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. पण या बंद विरोधात मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी तातडीने आज (दि.२३) सुनावणी देखील पार पडली. मुंबई हायकोर्टाने हा बंद बेकायदेशीर ठरवत राज्य सरकारला तसं झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. या ट्विटममध्ये शरद पवारांनी महाविकास आघाडीला उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केले आहे. त्यामुळे कदाचित उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शरद पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता.
हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालय यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन करतो असं पवार यांनी म्हटलं आहे.
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 23, 2024