मुंबई : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात विस्तव जात नाही आहे. राऊत यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर जगरी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे शुर्पणखा आणि या शुर्पणखेचे नाक कापल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. बाळासाहेब वाघ असतील तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेले डाग आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यांनी केला आहे.
कधी ऐकलं आहे का की कोण आला रे कोण आला भाजपचा वाघ आला. शिवसेना हीच खरी वाघांची सेना आहे. बाबरी पा़डल्यानंतर त्याचे आरोपपत्र एकदा फडणवीसांनी बघावं. राम मंदीर फक्त एकाच व्यक्तीमुळे उभे राहिले आहे असे त्यांना वाटतं. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे चेले एक नंबरचे खोटारडे आहेत, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
शंकराचार्यांचा बहिष्कारावरून संजय राऊत टीका
नामांकीत चारही शंकराचार्यांनी राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला बहिष्कार घातला त्याविषयीही संजय राऊतांनी भाष्य केले. अर्धवट झालेल्या राम मंदिराच्या उद्घाटनावर चारही शंकराचार्यांनी बहिष्कार घातला आहे, असे संजय राऊत म्हणाले. देशातील सर्वात मोठे शंकराचार्य नरेंद्र मोदी आहेत, असं भाजपाला वाटत असावे. त्यामुळे श्री राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाला शंकराचार्य येत नसतील.