मुंबई : राज्यातील जनतेने महायुतीला जबरदस्त असे बहुमत दिल्यानंतर सत्ता स्थापन करण्यास होत असलेला विलंब आणि नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होत नसल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीला त्यातही भाजपला जनतेने विशेष पसंती दिल्यानंतर सरकार स्थापन होत नसल्याने जनतेत चुकीचा संदेश जात असल्याचे संघाने म्हटलेले आहे.
तसेच फडणवीस यांच्या नावावरून संभ्रम निर्माण करण्याचे कोणतेही कारण नाही. मराठा समाजाचे दोन उपमुख्यमंत्री होणार असताना मराठा मुख्यमंत्री न दिल्यास काय परिणाम होतील, अशी चर्चा करण्याचे कोणतेही कारण नाही, असे संघातील धुरिणींना वाटते. रविवारी विदर्भ विभागातील संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यातही यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.