Ravindra Berde Passed Away : ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून रविंद्र बेर्डे घशाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांना उपचारासाठी टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
रविंद्र बेर्डे हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. आपल्या भूमिकेने मराठी मराठी सिनेसृष्टीत त्यांनी वेगळीच ओळख निर्माण केली होती. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. यांच्यावर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान मागील दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयायातून घरी सोडण्यात आलं होतं.
आजारपणातही नाटकाची आवड जपली
1995 मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान रवींद्र बेर्डे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावर मात केल्यानंतर 2011 मध्ये त्यांना कर्करोगाचं निदान झालं. आजारपणातही त्यांनी नाटकाची आवड कायम जपली. रवींद्र बेर्डे यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं होतं.
सिंघम, चिंगी यांसारख्या चित्रपटांमध्ये तर, आनाडी, खतरनाक, होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, उचला रे उचला, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा, हाच सुनबाई चा भाऊ यांसारख्या गाजलेल्या मराठी सिनेमांमध्ये रविंद्र बेर्डे यांनी काम केले होते.1965 पासून त्यांची नाट्यसृष्टीशी नाळ जोडली गेली.