मुंबई : महाराष्ट्रात सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणुक होणार आहे. या सहा जागांसाठी सात जणांनी अर्ज केले होते, त्यामधील एका उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला आहे. त्यामुळे आता निवडणूक बिनविरोध होणार आहे.
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या निवडणुकीसाठी दाखल झालेला अपक्ष उमेदवाराचा सातवा अर्ज छाननीत बाद झाला आहे. 20 फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यादिवशी याबाबतची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
भारतीय जनता पक्षाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे या तिघांनी अर्ज केले. तर, शिवसेनेकडून मिलिंद देवरा, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांनी अर्ज दाखल केले. तर अपक्ष म्हणून विश्वास जगताप यांनी अर्ज भरला होता. मात्र, या निवडणूकीसाठी सूचक, अनुमोदक म्हणून आमदारांच्या सह्या लागतात. त्याची पुर्तता जगताप यांच्याकडून करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचा अर्ज छाननीत बाद करण्यात आला आहे.